Navneet Kaur Rana: पोलीस स्टेशनच्या बाहेरच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या हनुवटीतून काढलं रक्त; व्हिडिओ व्हायरल..

0

Navneet Kaur Rana: गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच दोन दिवसांपासून राणा दाम्पत्यानी शिवसेनेला (shivsena) दिलेल्या आव्हानामुळे मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मातोश्रीबाहेर (matoshree) हनुमान चालीसाचे (Hanuman chalisa) पठण होणार असा इशारा खासदार नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांनी शिवसैनिकांना दिल्याने, काल मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाले.

का झाला वाद?

काही दिवसापूर्वी अमरावती मधून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन आपण हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी तुम्ही मातोश्री काय मुंबईत येऊन दाखवा असे आव्हान दिलं होतं. मात्र गनिमी कावा करत हे दांपत्य मुंबईत आपल्या निवासस्थानी दाखल झालं. मात्र शिवसैनिकांनी नवनीत राणा यांच्या मुंबईच्या (Mumbai) निवासस्थानी मोठी गर्दी केली.

कलम १५३ नुसार गुन्हा दाखल

अखेर खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अटक केली. १५३-अ कलमाअंतर्गत या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्या यांना रात्री खार पोलीस स्टेशनला भेटायला गेले. तब्बल दीड तास किरीट सोमया खार पोलीस स्टेशनमध्ये होते. तर बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पोलिस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत सोमय्या यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली. त्यातून रक्त देखील आल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या दगडफेकीमुळे आता राजकारण चांगलंच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत, महा विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महा विकास आघाडी सरकारचा झेड प्लस सुरक्षा असणारे व्यक्तीलाच संरक्षण देऊ शकत नसेल तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे. मी यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

24 तासापूर्वी मोहित कंबोज यांच्या वर हल्ला करण्यात आला त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आणि आता किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. विशेष म्हणजे किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये असताना बाहेर सत्तर-ऐंशी जणांचा जमाव जमला होता. सोमय्या यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. हे माझ्यावर हल्ला करतील असे, देखील सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं आणि काही कारवाई केली नाही असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सोमय्या यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर केलेल्या तक्रारीनुसार किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महाडेश्वर यांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फूटून सोमय्या यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोमय्या यांच्या हनुवटीतून र क्त देखील आल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले गृहमंत्री?

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांनी या प्रकरणावर बोलताना सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे, ही गोष्ट खरी आहे. हा हल्ला कोणी केला हा तपासाचा भाग असून, मुंबई पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करून योग्य ती कारवाई करतील. अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हे देखील वाचा व्हिडिओ: शिवसैनिकांनी शिंपडले गोमूत्र; सोमय्या म्हणाले पुण्यापेक्षा हे केव्हाही चांगलंच, मला इथं मारलं तर नाही..

किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा म्हणजे..,पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसच अडचणीत..

दादा बघा माझी अवस्था; किरीट सोमय्यांचा चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा, चंद्रकांत पाटील म्हणाले..

धक्कादायक खुलासा..! शिवसेनेच्या या बड्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच किरीट सोमय्यांवर हल्ला..

Chandramukhi: बरखा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संबंधांची आज नव्याने चर्चा का होतेय? तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.