Jhund: बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम

0

‘स्लमसॉकर’चे संस्थापक विजय बरसे (Vijay barse) यांच्यावर आधारित असणाऱ्या नागराज मंजुळे (nagraj manjule) दिग्दर्शित, ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाने सध्या सोशल मीडियावर आणि चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गज मंडळींनी नागराज मंजुळे यांचं कौतुक करताना, हा चित्रपट अफलातून असल्याचं म्हंटले आहे. एकीकडे या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असलं तरी, दुसरीकडे या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb ambedkar) आणि अभिताभ बच्चन (amitabh bachchan) हे एकाच फ्रेममध्ये का आले? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र आता स्वतः नागराज मंजुळे यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

‘झुंड’ हा चित्रपट काल महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात प्रदर्शित झाला. अभिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक कारणांमुळे चर्चेत होता. अत्यंत गरीब आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना घेऊन ‘झुंड’ बनवण्यात आल्यानं, हा चित्रपट चर्चेत होता. त्याच बरोबर बाबासाहेब आंबेडकर आणि अमिताभ बच्चन हे एकाच फ्रेममध्ये दाखवण्यात आल्याने, देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. याचे कारण म्हणजे, असे दृश्य यापूर्वी कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळाले नाही.

‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतीत या चित्रपटात काम केलेली, ही मुलं नागपूरच्या एका झोपडपट्टीत राहत आल्याचं समजलं. एवढंच नाही तर, काहीही उद्योग नसणारी, ही मुलं टवाळखोर, आणि चोऱ्या करत असल्याचं देखील अनेकांना कळाले. अशा पोरांना घेऊन चित्रपट बनवणे, म्हणजे कल्पनेच्या बाहेरचं आहे. अशी देखील चर्चा ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वी बघायला मिळाली. कलाकृतीचं कसलंही ज्ञान नसणारी पोरं महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर कसं काम करू शकतील, याची चर्चाही जोरदार रंगली होती.

मात्र आता चित्रपट प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर नागराज मंजुळे आणि टीमचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळतंय. या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटाचे सगळेच कलाकार नायक वाटत असल्याचं अनेकांनी म्हंटले आहे. काल कोथरूड सिटी प्राईड चित्रपटगृहाबाहेर प्रीमियर शोनंतर प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटगृहाबाहेर नागराज मंजुळे, अजय-अतुल, आणि संपूर्ण चित्रपटाची टीम हलगी वाजवत असलेला, व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

एकीकडे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही, या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असली तरी, अनेकांना अभिताभ बच्चन आणि बाबासाहेब आंबेडकर हे एका फ्रेममध्ये का दाखवण्यात आले आहेत. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता लागून,राहिल्याचे पहिल्या मिळते. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः नागराज मंजुळे यांनी दिले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर प्रचंड झाला आहे. त्यांच्या विचारांना अनुसरूनच मी चालत असतो.

यापूर्वी कधीही बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात दिसले नाहीत. असं पहिल्यांदाच झालं, सिनेसृष्टीतले महानायक अभिताभ बच्चन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर हात जोडून उभा आहेत. माझ्यासाठी हा क्षण अविस्मरणीय असल्याचं नागराज मंजुळे यांनी म्हटलं. आपल्या जवळ असे अनेक महापुरुष आहेत, त्यांना अजूनही आपण नीट समजून येऊ शकलो नाही, समजून घेतलं नाही.

बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व जगात अभ्यासलं जात. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्यावरही आहे. चित्रपट पाहिल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. असंही नागराजने म्हंटले होतं. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर, या चित्रपटाने जातीव्यवस्थेवर देखील भाष्य केलं असल्याचं जाणवतं. आणि कदाचित म्हणूनच, नागराज मंजुळे यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना एकाच फ्रेममध्ये दाखवलं असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा तुटलेले डब्बे,पाईप,पत्रे वाजवणाऱ्या पोरांसोबत अमिताभ बच्चनचे ‘हे’ आहे कनेक्शन; ‘झुंड’च्या ‘टीझर’चा धुमाकूळ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.