तुटलेले डब्बे,पाईप,पत्रे वाजवणाऱ्या पोरांसोबत अमिताभ बच्चनचे ‘हे’ आहे कनेक्शन; ‘झुंड’च्या ‘टीझर’चा धुमाकूळ…

0

नागरच मंजुळे दिग्दर्शित (nagraj manjule)’झुंड’ (zund) या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या चार तासात तीस लाख लोकांनी हा टिझर पाहिला आहे. फॅन्ड्री आणि सैराट सारख्या चित्रपटांमधून आपली छाप सोडणारे नागराज मंजुळे आपला आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला चित्रपट गृहात प्रदर्शित करणार आहेत.

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या कलाकारांना घेऊन ग्रामीण धाटणीचा चित्रपट नागराज मंजुळे यांनी जगात गाजवला. एखाद्या प्रादेशिक भाषेत रिलीज झालेल्या चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक कमाई करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. लहानपणापासून अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहण्यासाठी अनेक वेळा शाळेला दांडी मारली आहे. आणि आता माझ्या चित्रपटात ते काम करणार आहेत, हे एखाद्या स्वप्नासारखं असल्याचे एका कार्यक्रमात नागराज मंजुळे म्हणाले होते.

‘झुंड’ या चित्रपटात अभिताभ बच्चन एका फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्यावर आधारित असल्याचं कळतंय. २००१ मध्ये गरीब विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळताना पाहून त्यांनी स्लमसॉकरची स्थापना केली. ही त्यांची कहाणी कमालीची रंजक असल्याचे आपण सत्यमेव जयते मधून पाहिलीच आहे. नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केल्यानंतर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती.

‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन कोचच्या भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाला अजय-अतुल यांनी म्युझिक दिले आहे. अजय अतुलचे म्युझिक म्हणजे, चर्चा तर होतेच. याही चित्रपटाच्या म्युझिकची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांची भूमिका काय असेल या बदल मात्र अजूनही काही कळले नाही.

‘झुंड’च्या टिझरची सुरुवात ही लहान पोरं पत्रा, डब्बा पाईप भांडी वाजवताना सुरू होते, आणि ही वाद्य वाजवत असताना, या पोरांकडे अमिताभ बच्चन येतात, आणि ही पोरं आपली वाद्य वाजवायची बंद करतात. नंतर ही पोरं अमिताभ बच्चनयांच्या मागे जात असताना पाहायला मिळते. ही पोरं वाजवत असणाऱ्या ह्यांची वाद्याकडे आपण इतके एकाग्र होतो की, हा टिझर पाहताना नकळत आपण देखील आपले पाय हलवू लागतो. ही या टिझरची कमाल आहे.

या टिझर मधून ही पोरं वाजवत असणारी त्यांची वाद्य, आणि अमिताभ बच्चन यांची इंन्ट्री प्रेक्षकांचे, कमालीचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळते. या पोरांचं आणि अमिताभ बच्चन यांचे कनेक्शन या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, येत्या ४ मार्चला हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.