समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी खाल्लं शेण; मोदी म्हणाले…
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. मराठी राजभाषा दिनाचे, निमित्ताने औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना, त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्र सरकारच्या विरोधी भूमिका घेत असल्याची टीका सातत्याने त्यांच्यावर होताना पाहायला मिळते.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र सरकारच्या विरोधी भूमिका घेत असल्याची टीका देखील त्यांच्यावरून मोठ्या प्रमाणात होताना दिसते. एवढेच नाही तर, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड तुम्ही प्रलंबित ठेऊ शकत नसल्याचं म्हणत, कोर्टाने देखील राज्यपालांना फटकारलं होतं. भगतसिंह कोश्यारी हे बीजेपी पूरक भूमिका घेत असल्याची टीका देखील त्यांच्यावर सातत्याने होताना पाहायला मिळते.
महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल हा वाद महाराष्ट्र सातत्याने पाहत आल्याचे दिसून येत असले, तरी आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने, आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज पुण्यात भगतसिंग यांनी केलेल्या विधानाला निषेध म्हणून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले हे विधान महाराष्ट्र द्वेषापोटी केलं आहे. मात्र महाराष्ट्राचा द्वेष करताना त्यांनी संपूर्ण हिंदुस्तानाची आस्था असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला. अशी व्यक्ती एकाद्या राज्याच्या राज्यपाल पदावर राहण्याच्या लायक नाही, अशी टिका आता समाज माध्यमांमधून होताना पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले राज्यपाल?
मराठी राजभाषा दिन, तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने औरंगाबादमध्ये श्री समर्थ साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? त्याच प्रमाणे समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं वादग्रस्त विधान त्यांनी या संमेलनात केले.
कोष्यारी पुढे म्हणाले, शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना माझा लहान दाखवण्याचा प्रयत्न नाही. असं बोलताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख या महाशयांनी केला. आपल्या आयुष्यात ज्या प्रमाणे आईचं मोठं योगदान असतं, तसंच समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी राज्य जिंकल्यानंतर समर्थांना म्हटलं, तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. हे घ्या तुमच्या ताब्यात, पण त्यांनी ते घेतले नाही, असंही कोश्यारी म्हणाले.
VIDEO: 'समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेंगा'; औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य@BSKoshyari #BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #Aurangabad #म #मराठी pic.twitter.com/5EeMjXexaK
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) February 27, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाची दखल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतल्याची माहिती मिळतेय. मात्र या विधानावर नरेंद्र मोदी काय कारवाई करणार याविषयी अद्याप काही समजू शकले नाही. परंतु आता या प्रकणावर नरेंद्र मोदी काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोषारी यांच्या या विधानामुळे आता राज्याचं राजकारण चांगलेच तापले असून,आज पुण्यात राष्ट्रवादीचे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील होणार आहे.
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू…
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात सोडले साप; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम