व्हिडिओ: रुपाली चाकणकर यांनी आपल्याच कार्यकर्त्यांची भर कार्यक्रमात काढली लायकी; अजित पवार म्हणाले….

0

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी नुकतीच, झी मराठी वाहिनीवरच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. “हे तर काहीच नाही” असं या कार्यक्रमाचं नाव होतं. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या राजकीय जीवनात काम करत असताना घडलेले, अनेक गमतीशीर किस्से शेअर केले. यातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय.

राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर, कार्यकर्त्यांची चांगली फौज असणं गरजेच असत. जर आपण नेता म्हणून कार्यकर्त्यांच्या गरजेला पडलो, तर हे कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी काहीही करायला तयार असतात. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र अलीकडच्या काळात कार्यकर्ता आणि नेता यांच्यामधील संबंधात पूर्वीसारखी एकनिष्ठता राहिली नसल्याचे, पाहायला मिळते. असाच एक किस्सा रूपाली चाकणकर यांनी “हे तर काहीच नाही” या कार्यक्रमात सांगीतला आहे.

झी मराठी या वाहिनीवरील “हे तर काहीच नाही” या ‘रियालिटी’शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या सोबत घडलेले किस्से सांगण्यासाठी येत असतात. फक्त सेलिब्रिटीच नाही तर, अनेक राजकीय नेत्यांनी देखील या कार्यक्रमांत हजेरी लावली आहे. नुकतेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घडलेला एक किस्सा सांगितला.

“हे तर काहीच नाही” या कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी कार्यकर्त्यांसोबत घडलेला वाढदिवसाचा एक किस्सा सांगितला. आणि आता त्याचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या संदर्भात बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, बऱ्याचदा कार्यकर्त्यांचा फोन येतो, ताई नमस्कार माझा उद्या वाढदिवस आहे. मला फोन करून उद्या शुभेच्छा द्या, असं कार्यकर्ते म्हणतात. याची गंमत म्हणजे, त्यांनी आपल्याला अगोदरच स्क्रिप्ट पाठवलेली असते. वाढदिवसादिवशी तीच त्यांना फोन करून बोलून दाखवायची असते.

या संदर्भातला खूपच मजेशीर किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी रुपाली चाकणकर यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचं बोललं जाऊ लागले आहे. त्यांनी हा किस्सा सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांची किंमत लोकांमध्ये नक्कीच कमी झाली आहे. असंही सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.