‘रैना’ला नाकारल्याने, दहा लाख चाहत्यांनी चेन्नईला ‘अनफॉलो’ केलंय; यावर काय म्हणाला धोनी
आयपीएल २०२२च्या मेगा लिलिवात अनेक खेळाडू मालामाल झाले, तर अनेक बड्या खेळाडूंना खरेदीदारही मिळाला नाही. या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघाची भर पडल्याने, काही महत्त्वाच्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्वच फ्रॅंचाईजीमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. ‘ईशान किशन’ या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र महागड्या खेळाडूंपेक्षा जे खेळाडू अनसोल्ड राहिले त्यांची या लिलावात अधिक चर्चा झाल्याचे दिसून आले.
चेन्नई सुपर किंग संचाने दीपक चाहरला तब्बल 14 कोटी मोजून खरेदी केलं. चेन्नई सुपर किंग संघाने दीपकला मोठी रक्कम मोजून खरेदी केलं असलं, तरी दुसरीकडे मात्र चेन्नई सुपर किंग संघाने गेल्या दशकापासून प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश रैनाला मात्र बोली देखील लावली नसल्याचं, पाहिला मिळालं आहे. किमान चेन्नई सुपर किंग संघाने तरी रैनाला खरेदी करायला हवं होतं, असं म्हणताना चाहते दिसून आले.
आयपीएल ऑक्शन झाल्यानंतर ट्वीटरवर सुरेश रैना दिवसभर ट्रेंड करत होता. मिस्टर आयपीएल म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरेश रैना सोबत असा प्रकार कसा काय घडू शकतो? असं ट्विटरवर चाहते बोलताना पाहायला मिळत होते. चेन्नई सुपर किंग संघानेही सुरेश रैनाला खरेदी केलं नाही यावरून सुरेश रैना आणि धोनीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चाही रंगल्या. एवढंच नाही तर, आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग संघाला सोशल मीडियावर जवळपास पाच लाख लोकांनी अनफॉलो देखील केल्याचा प्रकारही घडला आहे.
महेंद्रसिंग धोनी प्रमाणे सुरेश रैनाची देखील एक वेगळी ओळख होती. कोणत्याही खेळाडूच्या सुखदुःखात तो सामील व्हायचा. अगदी विरोधी संघाच्या खेळाडूंनी देखील उत्तम फलंदाजी, गोलंदाजी केली तर, तो त्याचं कौतुक करताना वेळोवेळी दिसून यायचा. आणि त्याच्या याच गुणामुळे तो सगळ्यांना हवाहवासा वाटायचा. त्यातच तो चेन्नई संघासोबत गेल्या दशकापासून जोडला गेला असल्याने, चेन्नईचे अनेक चाहते नाराज झाले. आणि म्हणून त्यांनी सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग संघाला अनफॉलोही केलं.
२०२० मध्ये दुबई येथे झालेल्या आयपीएलमध्ये सुरेश रैनाने अचानक माघार घेतली होती. सुरेश रैनाने आपल्या संघाला संकटात टाकल्याचं त्यावेळी देखील बोललं गेलं होतं. मात्र कोव्हीडमुळे त्याने हा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून चेन्नई सुपर किंग संघाच्या मालकाशी, कॅप्टन धोनीशी त्याचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. असं देखील आता बोलण्यात येत आहे. मात्र सोशल मीडियावर अशा चर्चा रंगत असतात, यात काही तथ्य असेल असं ठामपणे म्हणता येणार नाही.
सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग संघाने नाकारल्यामुळे मात्र त्यांना खूप मोठे नुकसान झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग आणि त्यांचे चाहते हे खूप मोठं इमोशन आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत चेन्नईचा खूप मोठा फॅन बेस आहे. आयपीएलच्या इतिहासात बेंगलोर नंतर सर्वाधिक फॅन असणारा संघ कोणता असेल, तर तो चेन्नई सुपर किंग आहे. मात्र सुरेश रैनाला साधा फेअरवेलही मिळाला नसल्याने, चेन्नईचे चाहते खूपच नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम