साडे तीन लोकांमधली ‘ही’ दोन लोकं जेलमध्ये; ठाकरे सरकारचा दणका

0

शिवसेना भवनात काल संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेली ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर महा पोर्टलमध्ये खूप मोठा भष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबावर सातत्याने हल्ला चढवत असल्याने शिवसेना देखील त्यांच्या विरोधात आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून सतत होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी काल संजय राऊत यांनी मुंबई येथे शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली.

अनेकांना या पत्रकात परिषदेत भाजपची ती साडेतीन लोक कोण? याची उत्सुकता लागून राहिली होती. लवकरच भाजपची साडेतीन लोकं जेलमध्ये जाणार, असं विधान संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी संवाद साधताना केले होते. कदाचित या पत्रकार परिषदेत भाजपचे ते साडेतीन लोकं कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळणार म्हणून या पत्रकार परिषदेला खूप मोठे महत्त्व आले होते. मात्र या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपची ती साडेतीन लोकं कोण याविषयी स्पष्ट बोलणं टाळलं.

पत्रकारांनी जेलमध्ये जाणारी भाजपची ती साडेतीन लोकं कोण आहेत? याविषयी विचारले, मात्र, ते स्पष्ट न बोलता, म्हणाले, उद्यापासून आपल्याला समजेल भाजपची ती साडेतीन लोकं कोण आहेत. संजय राऊत यांच्या या विधानामुळे भाजपच्या साडेतीन लोकांविषयी लोकांच्या मनात आणखीनच कुतूहल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी खोदा पहाड निकला चूहा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जे म्हटले आहे, ते गेल्या काही महिन्यांपासून म्हणत आहेत. यात नवीन काही नाही. महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे,तुम्ही चौकशी आणि कारवाई करा. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरी, संजय राऊत यांनी मात्र आज सकाळी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट करत म्हटलं आहे, “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch कोठडीचे sanitization सुरू आहे जय महाराष्ट्र”

संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटमुळे आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर शिवसेनेने आता कारवाई सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा आता खरोखरच जेलमध्ये जाणार का? याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत असून, अनेकांनी भाजपच्या साडेतीन लोकांमधली दोन लोक आता लवकरच जेलमध्ये असणार आहेत, असंही बोललं जाऊ लागलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.