संजय राऊत यांनी उल्लेख केलेल्या, नऊ कोटींचे कार्पेट हातरणार तो वनमंत्री कोण

0

शिवसेना भवनात आज संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेली, ही पत्रकार परिषद पहाण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा दलाल आणि भडवा असा उल्लेख केलेला. याबरोबरच त्यांनी भाजपच्या काही मोठ्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले.

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबावर सातत्याने हल्ला चढवत असल्याने शिवसेना देखील त्यांच्या विरोधात आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून सतत होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज संजय राऊत त्यांनी मुंबई ते शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सुधीर मुनगंटीवार त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.

संजय राऊत म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नात ज्या ज्या लोकांनी तयारी केली, ज्यांनी ज्यांनी माझ्या मुलीला मेहंदी काढली, त्या लोकांच्या घरी जाऊन इडीने किती पैसे दिले याची चौकाशी केली. अगदी माझा एक टेलर आहे, त्याची देखील चौकशी केली. मात्र मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातला एक वनमंत्री आहे, त्याने आपल्या मुलीच्या लग्नात जंगलाचा फील यावा म्हणून, त्याने जगलाची सजावट केली. त्याच्या लग्नात कार्पेटचा खर्च तब्बल नऊ प कोटी खर्च आला होता असा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर या विषयी अनेकांनी हा माजी वनमंत्री कोण होता, याविषशी सर्च करायला सुरुवात केली. तर हा दुसरा तिसरा कोणी नसून, हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याचं आता समोर आले आहे. ३ डिसेंबर २०१९ला पार पडलेल्या या लग्नाची खूप चर्चा झाली होती. संजय राऊत म्हणाले आम्ही म्हणतो, जाऊद्या घरात महत्वाचा आनंदाचा क्षण असतो मात्र तुम्ही आमच्या घरात घुसला तर आम्हीला देखील हे सर्व नाईलाजाने काढावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत अनेक विषय जात घातला. खासकरून त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, पंजाब नॅशनल बँकत किरीट सोमय्या यानेच भष्टाचार केला असा एकेरी उल्लेख करत संजय राऊत आरोप केला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.