स्टेज सजला, दोन दिवसांत ५९० खेळाडू विकले जाणार; पहा कोणाला मिळणार सर्वात जास्त रक्कम

0

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) प्रेक्षकांना आता दोन नवीन संघ पाहायला मिळणार असून, इथून पुढे एकूण दहा संघ आयपीएलच्या चषकासाठी एकमेकांना भिडणार आहेत. नवे दोन या स्पर्धेत उतरणार असल्यामुळे, प्रत्येक संघाला नवीन संघ बांधणी करावी लागणार आहे. याचीच तयारी म्हणून (IPL 2022) लिलावच्या या हंगामासाठी होणार्‍या मेगा लिलावासाठी आता बंगळुरूमध्ये (banglore) स्टेज तयार करण्यात आला आहे.

IPL 2022 लिलावच्या या हंगामासाठी होणार्‍या मेगा लिलावासाठी आता बंगळुरूमध्ये स्टेज तयार झाला असून, याठिकाणी येत्या दोन दिवसांत एकूण दहा संघासाठी ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. या लिलावात अनेक बडे खेळाडू लखपती तर काही करोडपती देखील होताना पाहायला मिळणार आहेत. अंडर१९ क्रिकेटर देखील या लिलावात अनेकांची पसंती बनताना पाहायला मिळणार आहे.

बंगळुरूमध्ये होणाऱ्या मेघा लिलावात एकूण ५९० खेळाडूंवर बोली लागणार असून, यात एकूण २२७ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दोन दिवसांत पार पडणाऱ्या या लिलावात एकूण दहा संघ तयार होणार आहेत. प्रत्येकी फेंचाईजीला आपला संघ बांधण्यासाठी ९० कोटींची मर्यादा असणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक संघाला खेळाडूंची संख्या ही मर्यादेतच ठेवावी लागणार आहे. प्रत्येकाला किमान १९ आणि कमाल २५ खेळाडूचं निवडायची मर्यादा असणार आहे.

महेंद्र सिंग धोनी, ( Mahendra Singh dhoni) विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा, ( Rohit Sharma) या मोठ्या खेळाडूंना आपापल्या संघांनी कायम ठेवले आहे. याव्यतिरिक्त आणखी काही खेळाडूंना आपापल्या संघांनी कायम ठेवले आहे. प्रत्येक संघांना जेमतेम तीनच खेळाडू कायम ठेवता येण्याची परवानगी असल्यामुळे या वेळेस प्रत्येकाला नव्याने संघ बांधणी करावी लागणार आहे. प्रेक्षकांना हा लिलाव हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे.

आज आणि उद्या बंगलोरमध्ये होणाऱ्या लिलावात डेव्हिड वॉर्नरला ( devid Warner) सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहल, (yuzvendra chahal) श्रेयस अय्यर, (shryash Iyer) हर्षल पटेल, आवेश खान, आश्विन, अर्रोन फिंच, मोहमद अझरुद्दीन, ईशान किसन, यांसारख्या खेळाडूंना खूप मोठी रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बरोबरच अंडर१९ क्रिकेट खेळाडूंकडे देखील अनेकांचं लक्ष असणार आहे. यात राज बावा, रवी कुमार, शेख राशिद, यांना मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.