“उत्तर प्रदेश आपल्या हातून गेलं…”; स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केलं कबूल व्हायरल ‘व्हिडिओ’मुळे भाजपात खळबळ

0

देशातल्या पाच विधानसभा निवडणुकीचा प्रचार आपापल्या पक्षाकडून जोरदार सुरु आहे. ही निवडणूक विकास, महागाई, शेतकऱ्यांचे हाल आणि बेरोजगारी या मुद्द्यावर होणार असल्याचं अनेकांकडून बोलण्यात येत आहे. बीजेपीला या निवडणुकीत खूप मोठा फटका बसणार असल्याचे देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. यात आता शिवराज सिंग चौहान यांची देखील भर पडली पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडिओने देशभरात खळबळ माजवली आहे. शिवराज सिंग चौहान ‘ऑफ द कॅमेरा’ बोलत असताना कोणीतरी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर शूट केला. आणि नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत शिवराज सिंग चौहान म्हणतायत, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव होणार आहे, यात काही शंका नाही, मात्र उत्तराखंडमध्ये देखील आम्हाला कडवं आव्हान आहे.

शिवराज सिंग चौहानच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, हा व्हिडिओ काँग्रेसने देखील शेअर केला आहे. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान काल पार पडल्यानंतर अनेकांनी भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणार नसल्याचं भाकीत केलं. २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीनेकाल मतदान झालेल्या ५८ जागांपैकी तब्बल ५३ जागा जिंकल्या होत्या. या 11 जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणात ताकत होती, तिथेच भारतीय जनता पार्टीचा पराभव होत, असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

पहिल्या फेजमध्ये अकरा जिल्ह्यात ज्या ५८ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्या जागा भारतीय जनता पार्टीची ताकद समजली जाते. मात्र तिथेच भारतीय जनता पार्टी पिछाडीवर पडल्याचं अनेकांकडून बोलण्यात येत आहे. आणि म्हणून उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव होणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा एक यासंदर्भातला व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान या व्हिडिओत, ऑफ द कॅमेरा भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव होणार आहे, यात काहीच शंका नाही, असं उपस्थितांना सागताना दिसत आहेत. उत्तराखंडमध्ये देखील आपल्याला मोठं आव्हान आहे. असंही ते म्हणताना ऐकायला येत आहे. आपण जे बोलतोय ते कॅमेरात कैद होतं आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी समोरच्या कोणालातरी हात करत, व्हिडीओ शूट करू नकोस, असंही म्हटल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीकडून यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण अध्याप दिलं गेलं नाही. ‘अॅरो’ न्यूज या वेबसाईटने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला असून, त्यांनी ही माहिती दिली आहे. शिवराज सिंग चौहान यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आता बीजेपीला याचा आणखीन फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.