“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा म्हणजे..,” पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसच अडचणीत

0

शनिवारी पाच तारखेला किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी त्यांचा पुणे दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेत जात असताना शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याने ते पायरीवरून खाली कोसळले. यात त्यांना मुक्कमार लागला. मात्र शिवसैनिकांनी केलेला राडा हा पूर्वनियोजित होता. एवढंच नाहीतर किरीट सोमय्या यांचे हात-पाय तोडण्याचा कट देखील रचण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी पायर्‍या चढून जात असताना किरीट सोमय्या यांना शनिवारी ५ तारखेला शिवसैनिकांनी अडवले. फक्त विरोधकांचाच नाही तर महानगर पालिकेत होणारा भ्रष्टाचार देखील उघड करा. अशी मागणी या शिवसैनिकांनी करत, घोषणा करायला सुरुवात केली. या दरम्यान धक्काबुक्की झाल्यानंतर किरीट सोमय्या पायरीवरून खाली कोसळले, यात त्यांना मुक्कामार लागल्याचही पुढे संचेती हॉस्पिटलच्याडॉक्टरांनी सांगितले.

किरीट सोमय्या पायरी वरून खाली कोसळल्या नंतर पोलिसांनी त्यांना उचलून व्यवस्थित गाडीत बसवलं. आणि महानगरपालिकेच्या आवारातून त्यांना घेऊन गेले. संध्याकाळी किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. संचिती हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर सकाळी किरीट सोमय्या यांना डिस्चार्ज मिळाला. किरीट सोमय्या यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेवर टीका करताना त्यांनी अनेक धक्कादायक आरोप देखील केले आहेत.

मला झालेली मारहाण ही पूर्वनियोजित कट होता. मी शिवसेनेनेच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने, माझ्यावर हा हल्ला झाला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रश्नांची उत्तर देणं अवघड जाणार, म्हणून हा माझ्यावर हल्ला करण्यात आला. असा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. एवढंच नाही तर काल त्यांनी एक अजब वक्तव्य देखील केले आहे. किरीट सोमय्या यांचे दोन्ही हात पाय तोडून टाका, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत, असा आदेश शिवसैनिकांना दिला होता. असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

 

मला मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुमच्या लक्षात येईल. मला मारण्याचा हा मोठा कट पुण्यात आखण्यात आला होता. ज्या पोलिस आयुक्तांनी ‘राकेश बावधन’ला पळवून लावले होते, तेच पुण्याचे आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर प्रश्न आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे, सीआयएसएफने जो अहवाल दिला आहे, त्यात देखील, पुणे पोलीस महानगरपालिकेतील सुरक्षा कर्मचारी, आणि शिवसेनेच्या हायकमांडने मिळून हा मोठा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.

संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे पुरावे माझ्या हाती लागले असल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. त्याबरोबरच अनिल परब यांच्यावर देखील आता कारवाई सुरू झाली आहे. रश्मी ठाकरे यांच्या भावाचा देखील भ्रष्टाचारात सहभाग आहे. या सगळ्यांवर मोठी कारवाई होणार आणि जेल होणार या भीतीने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले, आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून मी चार-पाच महिने उठलो नाही पाहिजे. असा कट उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या आदेशाने रचण्यात आला असल्याचा, धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.