‘या’ नेत्यांची पोरं दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे माझ्याकडे पुरावे; ‘बंडा तात्यां’नी नाव घेतल्याने राजकारण पेटले
व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने साताऱ्यात झालेल्या आंदोलनात बंडातात्या कराडकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्या सरकारच्या मंत्रीमंडळाने किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात माध्यमांशी संवाद साधताना बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा जोरदार समाचार घेतला. सोबत त्यांनी अनेक वादग्रस्त विषयांचा उलगडा देखील केला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीच्या निर्णयावर बंडातात्या यांनी जोरदार टीका केली. फक्त टिकाच नाही तर, बंडा तात्या कराडकर यांनी अनेक मंत्र्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला. विशेष म्हणजे बंडातात्या कराडकर यांनी हे आरोप करताना काही नेत्यांच्या मुलांची नावे देखील घेतली आहेत. बंडातात्या कराडकर फक्त नावे घेऊनच राहिले नाहीत, तर या नेत्यांनी जर मला आव्हान दिलं, तर मी यासंदर्भातले पुरावे देखील देऊ शकतो. असा धक्कादायक खुलासा देखील बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात ‘किराणा’ आणि ‘सुपर मार्केट’मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या द्राक्ष उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रिमंडळाकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनीकडून सडकून टीका करण्यात आली. विरोधकांबरोबरच राज्यातल्या काही संघटनांनी देखील या निर्णयाला विरोध केल्याचे पाहिला मिळाले. यात आता बंडा तात्या यांच्या व्यसनमुक्त युवक संघाची देखील भर पडली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात साताऱ्यात झालेल्या आंदोलन दरम्यान बंडातात्या कराडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक विधानं केली आहेत. राज्यातल्या अनेक मंत्र्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडलेलल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असं ते म्हणाले आहेत. हे सगळं बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी काही मंत्र्यांच्या मुलांची नावं देखील घेतल्याने एकच एकच खळबळ माजली आहे.
या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलत असताना बंडातात्या कराडकर म्हणाले, पतंगराव कदम यांचा मुलगा कशाने वारला? हे मला विचारा, एवढंच नाही तर, गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे हीदेखील दारू पिते. असं खळबळजनक विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. बंडातात्या कराडकर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे ही देखील दारू पिते, असं खळबळजनक विधान केलं आहे. जर सुप्रिया सुळेंनी आव्हान दिले तर यासंदर्भातला मी पुरावा देखील द्यायला तयार आहे. असंहीबंडातात्या कराडकर म्हणाले आहेत. बंडा तात्या कराडकर यांच्या या दाव्याने राज्यात आता एकच खळबळ उडाली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम