अजित पवारांमुळे उद्धव ठाकरे बिघडले, वाण नाही पण गुण लागला; बंडा तात्या कराडकर असं म्हणाले, ऐकून तुम्हीही…

0

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात ‘किराणा’ आणि ‘सुपर मार्केट’मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या द्राक्ष उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रिमंडळाकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनीकडून सडकून टीका करण्यात आली. विरोधकांबरोबरच राज्यातल्या काही संघटनांनी देखील या निर्णयाला विरोध केल्याचे पाहिला मिळाले.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असतानाच, आता जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देखील यात उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. “व्यसनमुक्त युवक संघा”च्या वतीने आज साताऱ्यात किराना आणि सुपर मार्केटमध्ये ‘वाइन विक्री’च्या विरोधात बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दंडवत दंडुका’ आंदोलन करण्यात आलं. फक्त आंदोलनच नाही, तर यावेळी बंडातात्या कराडकर यांनी सरकारला जोरदार फटकारले आहे. आणि सोबत काही धक्कादायक विधानं देखील केली आहेत.

किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला हा निर्णय जर विधानसभेत मांडला असता, आणि मंजूर केला असता तर, आम्हाला आंदोलन करण्याची वेळच आली नसती. कारण हा निर्णय तिथे मंजूरच झाला नसता. महाराष्ट्रातील मुठभर आमदारांकडून दारुविक्रिचा हा अत्याचारी निर्णय महाराष्ट्रावर लादण्याचं काम झालं आहे. या नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात. हे मला चांगलंच माहीत आहे. एखाद्याने यासंदर्भातले पुरावे मागितले, तरी पुरावे द्यायला मी तयार आहे. असा धक्कादायक खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

बंडातात्या कराडकर या वेळी प्रचंड संतापल्याचे पाहिला मिळाले. गेली २५ वर्ष आमचा ‘व्यसनमुक्त युवक संघ’ या संदर्भात काम करत आहे. प्रत्येक युवक व्यसनमुक्त बनला पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था तळमळीने काम करते. आणि म्हणून शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत असून, हा त्यांना इशारा देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत असल्याचं, बंडातात्या कराडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

सरकारवर टीका करताना बंडातात्या यांचा रोष अजित पवार यांच्याकडे असल्याचं अधिकतेने जाणवत होतं. उद्धव ठाकरे साधे आणि सरळ मार्गी आहेत. मात्र ढवळ्याशेजारी पोवळ्या बांधला तर, वाण नाही पण गुण लागतोच, असंच यांच्या बाबतीत झालंय. आमच्या शेतकऱ्यांची ही म्हण आहे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं देखील झालं असल्याचं, बंडातात्या कराडकर म्हणाले. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दारू विकण्याचा गुण लावला. एवढंच नाही तर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना राज्यातली मंदिरे खुली करू नका, असं देखील सांगितलं असल्याचं, विधान बंडातात्या कराडकर यांनी यावेळी केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.