भारतात जाऊ नका,बलात्कार आणि दहशतवाद वाढलाय; ‘जो बायडेन’ यांच्या वक्तव्याने खळबळ

0

अलीकडच्या काळात भारतामध्ये बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. खास करून उत्तर प्रदेश राज्यांमध्ये यांचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे पहिला मिळते. बलात्काराबरोबरच देशात दहशतवाद देखील मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा, आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. नोटबंदी केल्यानंतर दहशतवादाला आळा बसणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. मात्र नोटबंदी करून देखील दहशतवाद संपला नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

एकीकडे विरोधकांकडून केंद्र सरकारवर भष्टाचार, दहशतवादाचा आरोप होत असतानाच आता दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील आपल्या नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचे आव्हान केले आहे. भारतामध्ये दहशतवाद आणि बलात्काराच्या संख्या वाढल्या असल्याच त्यांनी आपल्या नागरिकांना म्हटलं आहे. जो बायडेन यांनी भारतात सध्या कोरोनाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या नागरिकांना सूचना करताना म्हटले आहे, जर तुम्ही भारताच्या दिशेने प्रवास करणार असाल तर त्याचा पुनर्विचार करावा कारण भारतामध्ये सध्या कारोनाचे संकट आहे, असं त्यांनी नोटीस काढून म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी थोड्यावेळाने आणखी एक नोटीस काढत म्हटले, corona बरोबरच भारतात जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद आहे.

भारतामध्ये दहशत वादाबरोबरच भारतात सध्या मोठया प्रमाणात बलात्काराच्या घटनाही वाढल्यात. त्यामुळे तुम्ही जर भारतात प्रवास करत असाल तर, याचा पुनर्विचार करावा. जो बायडेन यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे, भारताची आता जागतिक पातळीवर चांगलीच नाचक्की झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या व्यवस्थेचे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी काढलेले वाभाडे पाहून आता हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.