आंधी नहीं तुफान है मोदी, नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ
पंचवीस वर्षे संसार केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर करत मुख्यमंत्री आमचाच होणार असं स्पष्ट केलं. आणि शिवसेनेच्या या भूमिकेवर अनेकांनी आश्र्चर्य व्यक्त केल्याचं दिसून आले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या१०५ जागा आल्यानंतर राज्यात भाजपचीच सत्ता येईल असं वाटतं असताना, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पहायला मिळालं.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना २०१९ च्या विधानसभा निवडणूक एकत्र लढली खरी, परंतु निकाल लागल्यानंतर शिवसेनेने आमचाच मुखमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आणि अनेक राजकीय चर्चेला उधाण आले. अवघ्या ५६ जागेवर शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, याचे गणित कोणालाही समजत नव्हते. मात्र शिवसेना खासकरून संजय राऊत मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचं सांगत राहिले.
शरद पवार, संजय राऊत आणि सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात समान किमान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आणि तेव्हापासून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाली. खास करून भाजपने यात महारत हासील केली. एकशे पाच आमदार येऊन देखील आपल्याला सत्ता स्थापन करता आली नाही. ही खंत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली. आणि याचाच परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर हल्लाबोल करत राहिली.
https://www.facebook.com/groups/703485936353678/permalink/4741398872562344/?app=fbl
संजय राऊत भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करत असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून संजय राऊत यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकसभा निवडणुकीदरम्यानचा असून संजय राऊत या व्हिडीओत नरेंद्र मोदींची स्तुती करताना पाहायला मिळत आहेत.
अयोध्या मंदिराचा प्रश्न सोडवायचा असेल, तर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करावे लागेल. एवढंच नाही तर आपण फक्त आता सर्जिकल स्ट्राइक केला आहे. नरेंद्र मोदींला पुन्हा निवडून दिल्यास पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून गायब होईल. असे देखील विधान संजय राऊत या व्हिडिओत करताना दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी आयोध्या मंदिराच प्रश्न नरेंद्र मोदी यांच्यामुळे नाही तर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निर्णयामुळे सुटला असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारा हा जूना व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम