मुंडे,महाजन खडसे नंतर पर्रिकर कुटुंबीयांचा नंबर; फडणवीसांच्या मनात आहे तरी काय

0

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश पंजाब राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर अधिक चर्चा गोव्याची होत असून, गोवा विधानसभा निवडणुकीची सगळी सूत्रे आपल्या हातात घेणारे फडणवीस देखील कमालीचे चर्चेत आहेत.

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भारतीय जनता पार्टीने पणजीतून टिकीट नाकारल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांची प्रभारी म्हणून निवड झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप गोवात निवडणूक लढवत आहे. मोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या परळीकर यांच्या पुत्रालाच त्यांनी विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने सगळ्यांनाच आश्चर्य व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर ज्या नेत्यांकडून आगामी काळात धोका आहे, जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, अशा नेत्यांना घरी बसवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार होताना पाहिला मिळाला आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे , बावनकुळे, विनोद तावडे, अशा अनेक दिग्गजांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणापासून लांब फेकल्याचा आरोप सातत्याने पहायला मिळाला.

गोवा विधानसभा निवडणुकीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेला हा आरोप आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर केलं. मात्र त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे पक्षाचे यूथ सेक्रेटरी आशिष मेटे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

राष्ट्रवादीचे योग सेक्युरिटी मेसेज मेटे यांनी आपल्या ट्विटर भरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवताना म्हटले आहे खडसे मुंडे-महाजन त्यांच्या कुटुंबानंतर आता मनोहर पर्रीकर यांच्या गोव्यात भाजप वाढवली त्यांच्याच कुटुंबाचे अस्तित्व संपवण्याचा देवेंद्र फडणीस याच्यावर होत आहे हा योगायोग म्हणायचा की आणखी काही असा सवाल त्यांनी उपस्थित केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आशिषमेटे यांनी केलेल्या टीकेला आता देवेंद्र फडणीस काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.