धक्कादायक..! प्रकरण भोवल्यानंतर नाना पटोलेंनीच उमेश घरडेला ‘गावगुंड मोदी’ म्हणून उभं केलं

0

काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले (nana patole) आता पुन्हा एकदा चांगलेच अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी नाना पटोले मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मारू शकतो असे म्हटले होते. हे प्रकारण चिगाळल्यानंतर नाना पटोले यांनी यू-टर्न घेत आमच्या गावात मोदी नावाचा गावगुंड आहे, आणि त्याला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असं म्हणालो असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं.

नाना पटोले यांनी मी आमच्या गावात मोदी नावाचा एक गाव गुंड आहे, त्याला मारू शकतो. असं म्हटल्यानंतर, या घटनेचा आढावा घेण्यासाठी काही माध्यमांनी नाना पटोले यांचं गाव गाठलं. आणि या घटनेचा आढावा घेतला. नाना पटोले यांच्या गावात खरंच मोदी नावाचा गावगुंड राहतो का? या विषयी माहीती घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. ज्या गावात नाना पटोल राहतात त्या गावात मोदी नावाचा गावगुंड अस्तित्वातच नसल्याचं गावकरी म्हणतात.

नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांच्या गावात मोदी नावाचा गावगुंड अस्तित्वातच नाही, तर नाना पटोल नेमकं मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं कोणाला म्हणाले? हा प्रश्न आता उपस्थित झाला असून, नाना पटोले चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांनी नाना पटोले यांनी चांगेच घेरले असून, त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे. एकीकडे जरी ही मागणी होत असली तरी दुसरीकडे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट देखील आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाना पटोले यांनी ज्या मोदींना मारण्याची भाषा केली होती ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केली होती, असं बोललं जाऊ लागलं. मात्र काल अचानक मोदी नावाचं गावगुंड ‘उमेश घरडे’ माध्यमांसमोर आला आणि पुन्हा या प्रकरणाने नवीन ट्विस्ट घेतला आहे. उमेश घरडे नावाचा हा इसम मलाच गावात मोदी म्हणतात असं म्हणतोय. माझी बायको मला सोडून गेल्यानंतर गावात सगळे मलाच मोदी म्हणू, लागले आणि तेव्हापासून मला मोदी नावाने ओळखू लागले. असं उमेश घरडे यांनी म्हटलं आहे.

जरी उमेश स्वतःला मोदी म्हणून घेत असला तरी, उमेश घरडे यांना आपणच मोदी असल्याचं बोलायला लावलं असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. एवढंच नाही तर, विरोधकांनी तर हे सगळं नाटक नाना पटोले यांनीच उभा केलं आहे. अशा आरोप करण्यात येतोय. आता या प्रकरणात नेमकं काय होतंय? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.