राणी’बागेतल्या माकडीनीचं नाव चित्रा वाघ,तर हत्तीच्या पिल्लांचं चंद्रकांत पाटील; अजब नावं ठेवण्याचं कारण महापौरांनी केलं स्पष्ट

0

12 तारखेला महाविकास आघाडी सरकारने, राज्यात दुकाने आणि आस्थापनेला मराठी पाट्या मोठ्या अक्षरांत लावण्याची सक्ती करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या निर्णयाचे सगळं श्रेय आम्हाला जात असल्याचं म्हटलं. मराठी पाट्यांचं राजकारण चांगलंच तापत असताना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ Chitra wagh) यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

१८ तारखेला मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी ‘वीरमाता जिजाबाई भोसले’ उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथे वाघाच्या बछड्याचे ”वीरा” तर हम्बोल्ट पेग्विनच्या पिलाचे “आँस्कर” असे नामकरण केले होते. पेंग्विनवरून शिवसेनेला (Shivsena) नेहमी ट्रोल केलं जात असतानाच, आता पुन्हा एकदा पेंग्विनच्या नामकरणावरून चित्रा वाघ यांनी महापौर ‘किशोर पेडणेकर'(Kishori Pednekar) आणि ‘मराठी पाट्या’ यावर टिका करत, एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र ट्विट करत, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या मराठी पाट्यांच्या निर्णयावर आणि किशोरी पेडणेकर यांच्यावरही जोरदार टीका केली. “साहेबांनी मराठीच्या पाट्या लावायला सांगितल्या आहेत, मराठी नामकरण करायला नाही” अशा आशयाचे एक व्यंग चित्र ‘चित्रा वाघ’ ट्विट करत केलं, आणि त्याला ‘मराठीचा पुळका देखाव्या पुरता’ असं ‘कॅप्शन’ दिलं.

‘चित्रा वाघ’ यांच्या टीकेला उत्तर देताना महापौर ‘किशोरी पेडणेकर’ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, वाघाच्या बछड्याचे नाव “विरा”‌ नाव ठेवले आहे, मात्र त्यांना ते दिसणार नाही. चित्रा वाघ म्हणतील, तसं आपण पुढच्या वेळेस करू. पुढच्या वेळेस आपण हत्तीच्या पिल्लांचं नाव ‘चंपा’ आणि माकडीणीच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ ठेऊया. असा घणाघात महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, आणि तेव्हापासून ‘चित्रा वाघ’ महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने जोरदार टिका करताना पाहायला मिळत आहेत. याचीच पोच पावती म्हणून की काय, चित्रा वाघ यांना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपद देखील बहाल केलं. एवढंच नाही तर,त्यांची थेट राष्ट्रीय कार्यकारिणी समीतीवरही निवड केली गेली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.