Sindhutai Sapkal | अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांचे निधन, जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला

0

अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ( Sindhutai Sapkal ) यांचे आज निधन झाले आहे. सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या मृत्युची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली असून सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रासह देशातील लोकांना दुःख अनावर झाल्याचे पहायला मिळत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) उर्फ माई यांच्यावर पुणे येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच माई यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.  त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होते. आज तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

सिंधुताई सपकाळ यांना लोक प्रेमाने माई म्हणत असायचे. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. 14 नोव्हेंबर 1947 रोजी सिंधुताईंचा वर्धा येथे जन्म झाला. त्यांच्या आईवडिलांना नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांनी तिचे नाव चिंधी ठेवले होते. त्यांना फार काही शालेय शिक्षण घेता आले नाही. त्या जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकल्या.

 

अनाथ मुलांसाठी माईंनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावामध्ये या संस्थेची घोडदोड सुरू झाली. इतर अनाथ लेकरांची सेवा करता यावी म्हणून आपल्या मुलीला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले.

 

सिंधुताई यांच्या बाल सदन संस्थेत अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. त्या ठिकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण मोफत दिले जाते. जेवण, कपडे आणि इतर सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले स्वतःच्या पायावर कशी खंबीर उभी राहतील यासाठी सुध्दा मार्गदर्शन केले जाते. तेथील तरूण आणि तरुणींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या लग्नाचे आयोजन करणे हे कार्य सुध्दा त्यांच्या संस्थेकडूनच केले जाते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.