पेपर फुटी प्रकरण: बंद करा तुमची नाटकं; विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा का करताय? रोहित पवारही संतापले
अल्पावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेले, राष्ट्रवादीचे युवा नेते, आणि तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असणारे रोहित पवार सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टीव असतात. फक्त सोशल मीडियावरच नाही तर, रोहित पवार सतत आपल्या मतदार संघातील लोकांच्या गाठीभेटी घेत असतात. अनेकांच्या नवीन व्यवसाय, दुकानाच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहतात हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतोच
एकीकडे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या नोकर भरती परीक्षा घेण्यास असक्षम ठरत असल्याच चित्र वर्षभरापासून पाहायला मिळत आहे. रोहित पवार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवताना पाहायला मिळतात. नोकर भरती परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यात याव्या अशी अनेक निवेदने रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी दिली देखील आहेत. मात्र यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही.
आरोग्य भरती परीक्षेच्या झालेल्या भोंगळ कारभारानंतर आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या घेण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये देखील भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य भरती परीक्षा प्रमाणेच म्हाडाची परीक्षा देखील जितेंद्र आव्हाड यांनी तांत्रिक अडचण सांगत अचानक पणे मध्यरात्री रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाविषयी हे सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याचे दिसून आले.
अचानक म्हाडाच्या परिक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना फार मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे एसटी बंद आहे. एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांकडून अवाढव्य गाडी भाडे आकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. अशा बिकट परिस्थितीत खेडेगावातून विद्यार्थी कसाबसा मुंबई-पुण्यासारख्या महागड्या शहरात पोहचतो.
या शहरांमध्ये राहण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची कसलीही सोय नसताना देखील, आपलं भविष्य सुखकर होण्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या मानत विद्यार्थी परिक्षा केंद्रे गाठतात. या विद्यार्थ्यांना अचानक म्हाडाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना किती मानसिक त्रास होत असेल, याचा विचारही करवत नाही. तरीदेखील हे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसून विद्यार्थ्यांची एकप्रकारे थट्टा करताना पाहायला मिळत आहे. असे आरोप वारंवार होताना पाहायला मिळत असतानाही या सरकारला काहीच फरक पडताना पाहायला मिळत नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमी जागरूक असणारे, रोहित पवार यांनीदेखील आरोग्य भरती आणि म्हाडाच्या परीक्षा घोळासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत म्हटले आहे, परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी सकाळी उठताच त्यांना परीक्षा पुढे ढकलली गेल्याचं कळत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु परीक्षा पुढे ढकलण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे.
परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी सकाळी उठताच त्यांना परीक्षा पुढे ढकलली गेल्याचं कळत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु परीक्षा पुढे ढकलण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे.@OfficeofUT@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP@Awhadspeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2021
मोठ्या मेहनतीने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून चुकीच्या गोष्टींची कुणकुण लागताच आव्हाड साहेबांनी स्पष्ट भूमिका घेत, परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी आज अडचणीचा वाटत असला तरी, त्यात विद्यार्थ्यांचंच हित आहे. असं रोहीत पवार म्हणाले आहे. एवढंच नाही तर पुढे रोहीत पवार म्हणाले, एवढ्यावरच थांबून चालणार नाही, विद्यार्थ्यांची लूट करणारे व्यवस्थेतील दलाल शोधून संपूर्ण व्यवस्थाच स्वच्छ करावी लागणार आहे. सर्वच परीक्षा #MPSC अंतर्गत घेणं,हाच यावर प्रभावी उपाय असू शकतो. असं म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे राज्य सरकारला घरचा आहेरच दिला आहे, असं म्हणावं लागेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.