सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई, निवडीपुर्वी बंद दाराआड नक्की काय झाले?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (Satara Jilha Bank Election) नुकतीच पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतर बरेच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. आमदार शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला. भाजपा आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी अगोदर अजित पवार नंतर शरद पवार यांची भेट घेतली होती.
पुन्हा मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष करा अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी अजित पवार व शरद पवारांना केली होती अशी माहिती आहे. तर उपाध्यक्षपदी शिवस्वरूपराजे खर्डेकर यांची वर्णी लागेल अशी फलटणकरांना आशा होती. मात्र आज अखेर बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) हे वाई सोसायटी गटातून बिनविरोध निवडून आले आहेत. ते लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र व वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तर उपाध्यक्षपदी निवड झालेले अनिल देसाई (Anil Desai) हे औद्योगिक, विणकर, मजूर संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आहेत.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीपूर्वी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बंद दाराआड बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे नूतन संचालक शिवस्वरूपराजे खर्डेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
हेही वाचा: आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर..
Satara: हे फक्त छत्रपतींचा वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्यात होऊ शकतं; शाहरुख यांचं होतंय सर्व स्तरातून कौतुक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम