‘हा घ्या पुरावा, हिंदूंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना’
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल मुंबई येथे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की ममता बॅनर्जी व आमच्यामध्ये राजकीय चर्चा झाली.
ज्यावेळी ममता बॅनर्जी आदित्य ठाकरे यांना भेटल्या त्यावेळी त्यांचे स्वागत करताना काढलेला फोटो भाजपाचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी तो फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एक ट्विट करत आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.
हा घ्या पुरावा, बदललेल्या शिवसेनेचा! ‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण. हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना. असे ट्विट करून तुषार भोसले यांनी आदित्य ठाकरे व शिवसेना यांना लक्ष केले आहे. शिवसेना, आदित्य ठाकरे व उद्घव ठाकरे यांच्यावर अशी टीका केल्याने शिवसैनिक भोसले यांना आता लक्ष करत आहेत.
काल ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा केली. ममता बॅनर्जी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. त्या ठिकाणी ममतांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्या असे संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हा त्या मुंबई दौऱ्यावर येत असतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले आमच्यात एक वेगळे नाते आहे. या बैठकीमध्ये औपचारिक चर्चा झाली. महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते परंतु ते दवाखान्यात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असे आदित्य ठाकरे मोडियाशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा: तब्बल सहा वर्षांनी रुपालीताई चाकणकर यांची या केसमधून निर्दोष मुक्तता
शरद पवारांनी रोहित पवारांना जिल्हा परिषद सदस्य केले पण अध्यक्ष केले नाही पण रामराजेंनी पुतण्याला..
धक्कादायक..! देवेंद्र फडणवीस यांचीच एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली; फडणवीसच सर्वस्वी जबाबदार
महिलांना त्रास देणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका, मॅनेजरला दिला चोप
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम