Narendra Modi: दाजी पुन्हा बरळले; पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते तर आता ‘मोदीं’ऐवजी ‘बायडेन’ यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा…

भाजपचे केंद्रीय मंत्री मंत्री रावसाहेब दानवे raosaheb danve आपली रांगडी भाषा आणि बेधडक बोलण्यासाठी परिचित आहेत. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना काही वेळा फायदा तर अनेक वेळा तोटा देखील सहन करावा लागला आहे. राज्यात भाजपच सरकार असताना शेतकऱ्यांविषयी त्यांनी केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य चांगलंच गाजलं होत. त्यानंतर त्यांना माफी देखील मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा रावसाहेब दानवेनी पेट्रोल दरवाढी petrol price संदर्भात अजब वक्तव्य केले असून, ते आता चांगलेच ट्रोल होताना दिसून येत आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढ हा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी असून देखील केंद्र सरकारने पेट्रोल शंभरीच्यावर नेउन ठेवलं असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल पाच तर डिझेलच्या दरात दहा रुपये कपात केली. तरीदेखील पेट्रोल आणि डिझेल शंभरच्यावर असल्याने विरोधकांकडून सातत्याने इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारवर टिका होताना पाहायला मिळत आहे.

इंधनाचे दर दररोज बदलत असल्यामुळे केंद्र सरकारला या दरवाढीवरून सर्वसामान्य देखील टीका करताना पाहायला मिळतो. आणि याचाच हवाला देत केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबादमध्ये एक धक्कादायक विधान केल्याचे पाहायला मिळाले. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या सभेचे आयोजन केले होते. ही सभा भाजपच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आली होती. या सभेत दानवेंनी इंधन दरवाढ संदर्भात केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून, दानवेंना ट्रोलही करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे म्हणाले, इंधन दरवाढीविरोधात आक्रोश मोर्चा काढता,मात्र इंधनाचे दर रोज बदलत आहेत याला, केंद्र सरकार जबाबदार नाही. इंधनाचे दर हे केंद्र सरकार बदलत नाही, तर जागतिक लेव्हलवर अमेरिका याचे दर ठरवत असते. आणि म्हणून इंधनाचे दर रोज कमी जास्त होत आहेत. असं अजब वक्तव्य करत रावसाहेब दानवे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी, औरंगाबादमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा काढला होता. यावर टीका करताना दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे.

दानवे यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली असून, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहिला मिळत आहे. सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा ट्विटरवरून समाचार घेत, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आता ‘अबकी बार बायडेन सरकार’ अशी घोषणा देखील देऊ शकतो. असा मिश्किल टोला लगावला आहे. आता पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे मोदीं ऐवजी ‘जो बाइडेन’ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची मागणी, रावसाहेब दानवे यांनी पक्षाकडे करावी,असंही सचिन सावंत म्हणत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.