Detergent In Fast Food: तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थात वापरतात कपडे धुण्याची पावडर, होतात असे परीणाम..

0

Detergent In Fast Food: आपल्यापैकी अनेक जणांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाण्याची आवड असते. आजकालच्या तरुणाईमध्ये तर फास्टफूड (Fastfood) ची प्रचंड आवड आहे.आपल्याला डॉक्टर (Doctor) अनेकदा  फास्ट फूड न खाण्याचा सल्ला देतात. तो सल्ला योग्यच असतो कारण आता एका नवीन अभ्यासातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे .त्या अभ्यासातून पिझ्झा (Pizza), बर्गर (Burger) किंवा इतर कोणतेही फास्ट फूड का आणि किती हानिकारक (Dangerous) असू शकतात याची धक्कादायक महिती समोर आली आहे. (Detergent  In Fast Food: Washing powder is used in the food you eat)

साप्ताहिक जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल एपिडेमियोलॉजीमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मॅकडोनाल्ड (McDonald), बर्गर किंग (Burger King), पिझ्झा हट (Pizaa Hut) यामध्ये चक्क डिटर्जंटचा (Detrgy) वापर केला जात आहे. त्यानंतर अनेक प्रसिद्ध फास्ट फूड फूड आउटलेट वरती प्रश्नचिन्न उपस्थित केल गेले आहेत .

मॅकडोनाल्ड (McDonald), बर्गर किंग (Burger King), पिझ्झा हट (Pizza Hut), डोमिनोज (Domino’s Pizza) सारखीअतीशय  लोकप्रिय रेस्टॉरंट चेनद्वारे बनवलेल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये ‘थॅलेट’ (Phthlate) या नावाचा पदार्थ आढळून आला आहे. ‘Phthlate’चा वापर  प्रामुख्याने  लवचिकता ,टिकाऊपणा आणि जास्त काळ  प्लॅस्टिक टिकवण्यासाठी प्लास्टिसायझर म्हणून वापर करत असतात.

थॅलेट्सचा वापर विनाइल फ्लोअरिंग, वंगण तेल, साबण, हेअर स्प्रे, लॉन्ड्री डिटर्जंट अश्या अनेक उत्पादनांमध्ये केला जातो .साप्ताहिक जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल एपिडेमिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातुन ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. यातूनच खाद्य पदार्थ  बनवणाऱ्या कंपन्या सर्वसाान्यांच्या जीवाशी कसे खेळत आहेत हे आता उघड झाले आहे.

आउटलेटमधून मिळणाऱ्या बर्गर (Burger), फ्राईज, चिकन नगेट्स , चिकन बरिटो  आणि चीज पिझ्झाच्या 64 नमुन्यांची ,जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट , बोस्टन युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याची तपासणी केली. त्यांच्या रिपोर्ट्सनुसार, DnBP नावाचे Phthalate 80 टक्क्यांहून अधिक अन्नपदार्था मध्ये आढळून आले आहेत आणि 70 टक्के phthalate DEHT होते.  DEHT हे एक प्लास्टिसायझर अन्न पदार्थामध्ये अधिक विषारी रसायनिक बदलासाठी सादर केले गेले.

याचा वापर बाटलीच्या टोप्या, कन्व्हेयर बेल्ट, फ्लोअरिंग साहित्य आणि जलरोधक कपड्यांमध्ये केला जातो .संशोधकांनुसार याचा मुलांच्या आरोग्यावर खूप विपरित परिणाम होतो .मुलांचे शिक्षण त्यात लक्ष न लागणे अश्या अनेक वर्तणुकीच्या  समस्यांमध्ये वाढ होण्यास ही कारणेदेखील जबाबदार असू शकतात. त्याचबरोबर याचा गंभीर परिणाम गरोदर महिलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

त्यामूळे बाहेरचे फास्ट फूड सारखे खाद्य पदार्थ खाताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे. संशोधकांचे म्हणणे आहे की हा अभ्यास मर्यादित आहे आणि हे पदार्थ फक्त एकाच शहरातून आले आहेत.  दुसरीकडे, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ने सांगितले आहे की ते लवकरच या बाबत अभ्यास करतील. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा. आम्हाला अशीच नवनवीन माहिती तुम्हाला देण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचा तरी फायदा होईल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.