Aryan Khan Drug Case: कोणत्याही पुराव्या’शिवाय’ लग्नाचे,जातीचे,जन्माचे दाखले काढून मिळतील; नवाब मलिक झेरॉक्स सेंटर

आर्यन खान Aryan Khan) ‘ड्रग्स प्रकरण’ आता एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं लोकांच्या अवती-भोवती फिरूनही काही मेळ लागताना दिसून येत नाही. दोन ऑक्टोबरला कार्डिलिया ‘क्रुझवर छापा टाकत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली. पुढे या प्रकरणाचा जस-जसा खुलासा होत गेला, तस-तसा भाजप आणि राज्य सरकार असा सामना पाहिला मिळाला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ‘नवाब मलिक’ सुरुवातीपासूनच आर्यन खान ड्रग्स प्रकरणं ‘फेक’ असून या प्रकरणाचा तपास करणारा अधिकारी समीर वानखेडे हा देखील एक फेक माणूस असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत होते. एवढेच नाही तर त्यांनी समीर वानखेडेंनी खोटं जात प्रमाणपत्र दाखल करत नोकरी मिळवली असल्याचाही, धक्कादायक आरोप नवाब मलिक (nawab Malik) यांनी केला.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने किरण गोसावी आणि सॅम डिसोझा दोघांमध्ये पंचवीस कोटी रुपयांची बोलणी झाली. तर अठरा कोटी रुपयांवर हे डील फायनल करण्यात आले. आणि यातले आठ कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा केल्यानंतर हे प्रकरण वेगळ्याच दिशेने जायला सुरुवात झाली. या प्रकरणाचा ट्विस्ट इथेच संपत नाही. काल एका प्रसिद्ध हॅकर मनीष भंगाळे यांनी देखील एक धक्कादायक खुलासा केल्याने खळबळ उडाली.

एकीकडे या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट आणि नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि नवाब मलिक असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समीर वानखेडे विरोधात नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत असून त्या संदर्भातले पुरावेदेखील ट्विटरवर शेअर करत आहेत. नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर करत असलेल्या आरोपांमुळे भाजपची अनेक नेतेमंडळी, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी देखील नवाब मलिक यांत्यावर ट्वीटरच्या माध्यमातून काल टीका केली होती. आज पुन्हा एकदा भाजपचे माळशिरस तालुक्याचे निलंबित आमदार राम सातपुते यांनीदेखील नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली असून नवाब मलिक यांना थेट झेरॉक्स सेंटरच म्हटलं असल्याने राम सातपुतेंनी केलेली टीका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते (ram Satpute) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. सध्या त्याची जोरदार चर्चाही होत आहे. राम सातपुते यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, “कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा. काहीही पुरावे नसतील तरी काढून मिळतील” नवाब मलिक झेरॉक्स सेंटर! अशा आशयाचे ट्विट राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.