Aryan Khan Drug Case: ‘ज्ञानदेवा’ला लाडाने ‘दाऊद’ म्हणण्या इतका महाराष्ट्र ‘पुरोगामी’ होता; कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा

2 ऑक्टोंबरला ‘कार्डिलिया क्रूज’वर छापा टाकत एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. अटक केल्यानंतर आर्यन खानच्या हाताला धरून एनसीबी ऑफिसपर्यंत नेणारा व्यक्ती हा एनसीबीचा कोणताही अधिकारी नसल्याचे, समोर आल्यानंतर या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचं बोललं गेलं. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सुरुवातीपासूनच हे प्रकरण ‘फेक’ असल्याचा दावा करत होते.

एकीकडे ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यामुळे, समीर वानखेडेंचे सर्वस्तरातून कौतुक होत होतं. मात्र दुसरीकडे सुरुवातीपासूनच के प्रकरण ‘फेक’ असल्याचा दावा नवाब मलिक करत होते. त्याचबरोबर एनसीबी अधिकारी ‘समीर वानखेडे’ विरोधातले अनेक पुरावे देखील नवाब मलिक सोशल मीडियावर शेअर करत होते. मात्र ते राजकारणाशी संबंधित असल्यामुळे सुरूवातीला त्यांच्या आरोपाला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही.

मात्र या प्रकरणाशी संबंधित असणारा, आणि स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल, याने एक ‘एफिडेविट’ सादर करत या प्रकरणाचा सगळा लेखाजोखा मांडला, आणि एकच खळबळ उडाली. प्रभाकर साईल एनसीबी, तसेच या प्रकरणाचा दुसरा साक्षीदार ‘किरण गोसावी’ यांच्या विरोधात काही धक्कादायक खुलासे केले, आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते ‘नवाब मलिक’ समीर वानखेडे यांच्यावर करत असलेल्या आरोपांमध्ये देखील काहीतरी तथ्य असल्याचं, बोललं जाऊ लागलं.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांचे एक जात प्रमाणपत्र शेअर केलं. समीर वानखेडे हे जन्मतः मुसलमान असून, नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राचा सहारा घेतल्याचा आरोप, नवाब मलिक यांनी केला. या जात प्रमाणपत्रामध्ये समीर वानखेडे यांचे नाव ‘समीर दाऊद’ दिसत असल्याने, पुन्हा एकदा या प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याचे पाहायला मिळाले.

‘नवाब मलिक’ यांनी पुढे समीर वानखेडे, यांचे यापूर्वी देखील मुस्लिम महिलेशी लग्न झालेले असून, हे लग्न देखील त्यांनी मुस्लिम पद्धतीनेच केले असल्याचे, फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नवाब मलिक यांनी केलेला सर्व आरोपांना प्रत्युत्तर देताना, समीर वानखेडे म्हणाले, माझं यापूर्वी मुस्लिम महिलेशी लग्न झालं आहे. मात्र माझ्या आईची मुस्लिम पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असल्यानेच, मी तशा पद्धतीने लग्न केल्याचं, समीर वानखेडे यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांचे काका ‘शंकर कचरूजी वानखेडे’ यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद कसं पडलं? हे एका टीव्ही चॅनलला, मुलाखत देताना सांगितलं होतं. समीर वानखेडे यांचे काका ‘शंकर कचरूजी वानखेडे म्हणतात, आम्ही लोखंडवाला परिसरात राहत असल्याने, या ठिकाणी मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांनी तुमचं नाव नामदेव कसं काय? असं विचारलं. आम्ही तुम्हाला दाऊद म्हणू शकतो का? अशी विनंती केली. यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी तुम्ही मला दाऊत म्हणा काहीही म्हणा,असं सांगितलं. आणि तेव्हापासून नामदेव यांना, लोखंडवाला परिसरात दाऊद नावांनी ओळखू लागले. मात्र त्यांचे रेकॉर्डला नाव हे ‘ज्ञानदेव’च असल्याचं त्यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी क्रांती रेडेकर यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडण केलं आहे. त्याचबरोबर क्रांती रेडकर यांनी देखील ‘ज्ञानदेव’ वानखेडे यांचं नाव ‘दाऊद’ कसं पडलं? हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडेकर म्हणाला, आमच्या सासूबाई, समीरच्या वडिलांना प्रेमाणे दाऊद म्हणत होत्या. कारण त्या मुस्लीम धर्माच्या होत्या. आता कोणी प्रेमाने दाऊद म्हणत असेल तर, त्यांचे ‘रि’लिजन कसं काय चेंज होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

क्रांती रेडकर यांनी, समीर यांच्या वडिलांचे ‘दाऊद’ नाव कसं पडलं? याचा अजब तर्क लावल्याने सोशल मीडियावर त्यांचे अनेक मीम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ पत्रकार ‘अमेय तिरोडकर’ यांनीदेखील क्रांती रेडकर यांनी लावलेल्या ‘तर्कवर’ एक मिश्किल ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

जेष्ठ पत्रकार ‘अमेय तिरोडकर’ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भातले एक भन्नाट ट्विट केले असून, ते ‘व्हाट्सअपवर’ मोठ्या प्रमाणात वायरलही होत आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने तयार केलेली “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” ही ‘टॅग लाईन’ प्रचंड गाजली होती. अमेय तिरोडकर यांनी या वाक्याचा वापर केला असून,त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचंही बोललं जातंय.”ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्या इतका, महाराष्ट्र पुरोगामी होता. कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा. अजब नावाची गजब कहाणी” असं ट्विट त्यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.