Chitra wagh: तुम्ही करा रे कितीही हल्ला,लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांच्या ‘ट्विट’मुळे आर्यन खान प्रकरणाला नव वळण…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने हल्ला करताना पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ महा विकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येतं. एकेकाळी राष्ट्रवादीत असणाऱ्या, चित्रा वाघ यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि तेव्हापासून त्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर देखील आगपाखड करताना दिसून येतात.
2 ऑक्टोंबरला कार्डिलिया ‘क्रुझवर एनसीबीने छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्स प्रकरणात अटक केली. अद्याप आर्यन खानला या प्रकरणात जामीन मंजूर झालेला नाही. आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीची, अनेक नेते मंडळी आल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. चित्रा वाघ या देखील आता समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ उतरल्या असून, त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं असल्याचं बोललं जातंय.
नुकत्याच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर देखील चित्रा वाघ यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून टीका केली होती. रावणाला मदत करणारी शुर्पणखा’ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवू नका असं ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केल्यानंतर याची जोरदार चर्चा देखील झाली होती.
महा विकास आघाडी सरकारवर देखील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ सातत्याने हल्ला चढवताना पाहायला मिळतं. नुकतेच त्यांनी दसऱ्याचे औचित्य साधत,हे सरकार म्हणजे तीन तोंडी रावनाचं सरकार असून जनताच लंकारुपी तीन तोंडी रावणाला दहन करेल असा घनाघात केला होता. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे. सध्या ते सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होताना पाहायला मिळत आहे. काहींनी चित्रा वाघ यांच्या ट्विटचा खडसून समाचारही घेतल्याचं पाहायला मिळते. तर काहींनी या ट्विटचं कौतुकही केल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर करून एक ट्विट करत म्हटलं आहे,
“तुम्ही त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानित केलंत, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याची जात धर्म काढली. तरीही तो डगमगला नाही. आपलं कर्तव्य बजावत राहिला. तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
चित्रा वाघ यांनी केलेले हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालं. चित्रा वाघ यांनी अशा प्रकारचं ट्वीट मुद्दामून केलं असल्याचं म्हटलं आहे. या ट्विट वरून एक नवा वाद होण्यासाठीच त्यांनी हे ट्विट केलं असल्याची सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळाले.
तुम्ही…
त्याला धमक्या दिल्या
त्याला अपमानीत केलं
त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या
त्याच्या बहिणीवर आरोप केले
त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं
त्याचा जात धर्म काढलातरीही तो डगमगला नाही
कर्तव्य बजावत राहीलातुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला#ISupportSameerWakhende— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 26, 2021
नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र शेअर करत खळबळ उडवून दिली होती. समीर वानखेडे यांचे नाव समीर वानखेडे कसं स्वामी राऊत वानखेडे असल्याचा त्यांनी म्हटलं होतं. खोटी कागदपत्र सादर करत त्यांनी ही नोकरी मिळवली असून, एका पात्र व्यक्तीला त्यांच्यामुळे नोकरीला मुकावे लागला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.