Aryan Khan bail: …तर ‘आर्यन खान’१५ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत; शाहरुख खानची दिवाळी ‘कडू’..

Aryan Khan Bail: 2ऑक्टोंबरला कार्डिलिया ‘क्रुझवर एनसीबीचे अधिकाऱी समीर वानखेडे यांनी छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आणि सर्वांच्या नजरेत समीर वानखेडे हिरो म्हणून समोर आले. मात्र हळूहळू या प्रकरणाचा उलगडा होत गेला. आणि काही धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे सुरुवातीपासूनच समीर वानखेडे हा ‘फेक’ एक माणूस असून,त्याने आर्यन खानवर खोटी केस दाखल केली आहे. असं वारंवार म्हणतं होते. मात्र सुरुवातीच्या काळात या आरोपांकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

मात्र दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा साक्षीदार असणारा प्रभाकर साईल याने, खळबळजनक दावा केला. आणि या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. किरण गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यामध्ये २५ कोटीची बोलणी सुरू होती तर १८ कोटींवर डिल फायनल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. असा धक्कादायक खुलासा प्रभाकर साईल यांनी केला. १८ कोटीतले,आठ कोटी समीर वानखेडेला द्यायची देखील चर्चा सॅम डिसुझा आणि किरण गोसावी यांच्यात झाली
असल्याचा, धक्कादायक खुलासा प्रभाकर साईलने केला. आणि या प्रकरणाचा सगळा फोकस आर्यन खानवरून समीर वानखडेकडे दिशेने वळला.

या प्रकरणाने आता नवं वळण घेतलं असतं तरी, आर्यन खानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. २ ऑक्टोबरपासून आर्यन खान न्यायालयीन कोठडीत आहे. दोन वेळा सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यन खानच्या वकीलाने २० ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असून आर्यन खानला आज तरी जामीन मिळतोय का नाही? याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिले आहे.

मात्र आर्यन खानच्या आज होणाऱ्या जमिनीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आर्यन खानला येत्या तीन दिवसात म्हणजे 29 नोव्हेंबर पर्यंत जामीन मिळाला नाही तर, आर्यन खानला 15 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीतच आपला मुक्काम करावा लागणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळते आहे. याचे कारण म्हणजे 30 आणि 31 तारखेला शनिवार आणि रविवार शासकीय सुट्टी आहे. तर एक तारखेपासून 15 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाला दिवाळीची शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात जामीन मंजूर नाही झाला, तर त्याला 15 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.

शिवाय मुंबई उच्च न्यायालय आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल 15 नोव्हेंबर पर्यंत राखून ठेवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जर असं झालं तर, आर्यन खान आणि त्याच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. सोबतच त्याला या वर्षीची दिवाळी न्यायालयीन कोठडीमध्येच साजरी करावी लागणार आहे. जर आज मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला तर, जामीन मिळवण्यासाठी त्याला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालय देखील नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय.

दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या देखील अडचणीत आता वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या प्रकरणासंबधी चौकशी करण्यासाठी आज समीर वानखेडे यांना दिल्लीच्या कार्यालात देखील बोलावल्याची माहिती मिळते आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.