Afganistan: ‘आतंकवादी’ तालिबान्यांसमोर नतमस्तक होण्यास अफगाणिस्तान संघाचा नकार; ‘या’ कारणामुळे राष्ट्रगीत गाताना रडले खेळाडू…

गेल्या काही महिन्यांपूर्वी अफगानिस्तान (Afganistan) देशावर कट्टरपंथी दहशतवादी संघटना तालिबानने कब्जा केला आहे. (The radical terrorist organization Taliban has occupied Afghanistan)अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी आपले सरकार स्थापन केल्यानंतर महिलांविषयी असणारे कडक नियम त्यांनी लागूही केले. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेट बंद करण्याविषयी चर्चा झाली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आमचा पुरुषाचा संघ अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर केले होते.

टी-20 विश्वचषकाच्या घमासानाला आता सुरुवात झाली असून, प्रत्येक संघाने अंतिम१२ फेरीचा एक-एक सामना खेळला आहे. काल अफगाणिस्तानने स्कॉटलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात तब्बल १३० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मात्र हा सामना खेळण्यापूर्वी टॉस झाल्यानंतर, राष्ट्रगीत गाण्यासाठी अफगाणिस्तान संघ मैदानावर आला, आणि सगळ्यांनी अफगाणिस्थानचा राष्ट्रीय झेंडा फडकावला.(Everyone waved the national flag of Afghanistan.)

कट्टरपंथी दहशतवादी संघटना तालिबानने अफगाणिस्थानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्थान नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि म्हणून टॉस झाल्यानंतर अफगाणिस्थान क्रिकेट संघ, राष्ट्रगीत गाण्यासाठी मैदानावर आल्यानंतर अफगाणिस्तान नागरिकांसाठी हा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण होता.

अफगाणिस्तान क्रिकेट संघातल्या प्रत्येक खेळाडूने आपल्या देशाचे राष्ट्रगीत गात असतानाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर, एका युजरनेम शेअर केला. अफगाणिस्तान संघातील प्रत्येक खेळाडू राष्ट्रगीत गात असताना भावनीक झाल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असल्याचंही यावेळी दिसून येत आहे. ट्विटरवरचा हा व्हिडीओ अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल यांनी रिट्विटही केला आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल वारंवार तालिबान आणि पाकिस्तानला टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळते. या ट्विटमध्येही त्यांनी पाकिस्तानला तालिबानचा साथीदार म्हटले आहे. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल यांनी एका युजरचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे, “आमच्या क्रिकेट हिरोंचे धैर्य त्याचबरोबर देशाप्रती असणाऱ्या एकनिष्ठेला, समर्पणाला माझा सॅलूट आहे” अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गात पाकिस्तानचे समर्थन असणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रध्वज उंचावला. मला याचा खूप अभिमान असल्याचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल यांनी रिट्विट करत म्हटले आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला साहेल पुढे असंही म्हणले, ‘तालिबान राजवटीला स्वत:ची कोणतीही ओळख नाही. या राजवटीला असा एक पंतप्रधान मिळालाय,ज्याला स्वतःचे काही अस्तित्व नाही, आवाज नाही. असा घणाघात त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

काबूल ताब्यात घेतल्यानंतर कट्टरपंथी दहशतवादी संघटना तालिबानने देशात शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला होता. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट संघाने त्यांनी लागू केलेला झेंडा न फडकवता अफगाणिस्तानचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. आणि राष्ट्रगीत गायले. हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा निर्णय ऐतिहासीक आणि धाडसी असल्याचंही अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती ‘अमरुल्ला साहेल’ यांनी म्हटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.