Virat Kohli ने शेअर केला मुलगी ‘वामिका’आणि अनुष्काचा फोटो; चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ‘विराट कोहली’साठी गेल्या वर्षभराचा काळ काही खास राहिलेला नाही. विराट कोहलीच्या ‘कॅप्टन’पदाविषयी माध्यमांमध्ये अनेक उलट-सुलट चर्चा बाहेर आल्याच्या आपण वाचल्या ऐकल्या असतील. कोहलीच्या कर्णधारपदा संदर्भात बीसीसीआय आणि विराट कोहलीमध्ये चर्चा झाल्याच्या बातम्या काही माध्यमातून बाहेर आल्या होत्या. (Virat Kohli shared photo of daughter ‘Wamika’ and Anushka; A shower of admiration from the fans)

मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केलं होते. परंतु त्यानंतर काही दिवसातच विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकपनंतर मी टि-ट्वेटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं. आणि माध्यमांमध्ये होत असणाऱ्या, चर्चा खऱ्या होत्या यावर शिक्कामोर्तब झाले.

क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात चढ-उतार आले असले तरी मात्र, तो आपले खाजगी आयुष्य खूप आनंदात जगताना पाहायला मिळतोय. नुकतेच त्याने ट्विटर अकाऊंटवरून आपल्या कुटुंबासोबत ब्रेकफास्ट करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आणि त्याचे कुटुंब,कमालीचे आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे.

टी- ट्वेंटी विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने देखील या विश्वचषकातला पहिला सराव सामना दिमाखात जिंकत चांगली सुरुवातही केली आहे. भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकातला पहिला सामना २४ तारखेला खेळायचा आहे.

सध्या भारतीय संघाकडे पुरेसा वेळ असल्यामुळे, भारतीय संघातील काही खेळाडू आपल्या कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत अतिशय आनंदात असल्याचे दिसून येत आहे. विराटने आपली मुलगी वामिका, पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा एक फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. यामध्ये तिघेही ब्रेकफास्ट करताना दिसून येत आहेत.

विरुष्काची मुलगी कशी दिसते? याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. मात्र अद्याप या दोघांनी आपली मुलगी वामिकाचा चेहरा लोकांना दाखवलेला नाही. ‘स्टार किड्स’ विषयी जाणून घेण्याची लोकांची खूप इच्छा असते. ती कशी दिसतात? काय करतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. मात्र विराट आणि अनुष्कानी आपल्या मुलीला लाइम-लाईट पासून अजूनतरी दूर ठेवलं आहे. या दोघांनी वामिकाचा चेहरा कॅमेऱ्यापासून दूर ठेवलेला आहे.

‘विराट’ने आज ब्रेकफास्ट करताना तिघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र या फोटोत देखील ‘वामिका’चा चेहरा दिसणार नाही. याची पुरेपूर काळजी विराट आणि अनुष्कानी घेतली असल्याचे, या फोटोत पाहायला मिळत आहे. विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचा चेहरा कॅमेरासमोर कधी आणणार? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आणखी बरीच वाट पहावी लागणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.