Chitra wagh: आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; भोंगळ कारभार आणि गोंधळी सरकार,चित्रा वाघ यांचा घणाघात

काल’षण्मुखानंद सभागृहा’मध्ये झालेल्या ‘दसरा मेळाव्यात’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातल्या अनेक विषयांवर भाष्य करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाचा आता विरोधकांकडून समाचार घेताना दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा ‘चित्रा वाघ’यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनावर ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टिका केली आहे. (Chitra Wagh has been strongly criticized through Twitter)

गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागच्या परीक्षा केंद्रावरून गोंधळ झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून घेण्यात येणारी परीक्षा रद्द झाली होती. परीक्षा महाराष्ट्र राज्याची,मात्र परीक्षाकेंद्रे विदेशात,परराज्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. परिक्षा केंद्रावरून झालेल्या गोंधळामुळे आरोग्य विभागाने ही परीक्षा रद्द केली होती. गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील ही परिक्षा पुन्हा २४ आणि ३१ आॅक्टोंबरला घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला. (The decision was taken by the health department on October 31,)

आरोग्य विभागाच्या परीक्षांचे नियोजन करणाऱ्या ‘न्यासा कंपनी’च्या गलथान कारभारामुळे यापूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. आज पुन्हा एकदा परीक्षा केंद्रावरून गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील एकाच विद्यार्थ्यांच्या दोन जिल्ह्यात परीक्षाकेंद्र आल्याने ‘विद्यार्थ्यां’मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा २४ व ३१ आॅक्टोंबरला होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही संवर्गात अर्ज भरले आहेत. परंतु दोन्ही संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी असल्याने दोन संवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आता एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.(Students who have applied from two categories will now have to skip one exam)

आरोग्य विभागाच्या नियोजन अभावी विद्यार्थ्यांच्या झालेल्या गोंधळावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा ‘चित्रा वाघ’ यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात आपण वडीलांना दिलेल्या शब्दामुळे मुख्यमंत्री झालो असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याचा समाचार घेताना, चित्रा वाघ म्हणाल्या,”मुख्यमंत्री काल म्हणालेत,मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय साहेब.. राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना” असा निशाणा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले. हीच परंपरा राज्य शासनाच्या प्रशासनानेही सुरू ठेवलीय, सरकार आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात सलग दुसऱ्यांदा नापास झालंय. सरकारी चुकीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही,त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. हे सरकार म्हणजे भोंगळ कारभार आणि गोंधळी सरकार असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.