Rohit Pawar: शिवसेना भाजपनंतर आता राष्ट्रवादीचीही हिदुत्वाकडे वाटचाल? रोहीत पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अहमदनगर|कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वजाची स्थापना करत, जगातला सर्वांत उंच भगवा ध्वज आज दसऱ्याच्या मुहूर्तावर उभारत आपल्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचे बोललं जातंय. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे,६ राज्ये,७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून काल दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रतिष्ठापनेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित असल्याने या सोहळ्याला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.(rohit Pawar swarj dhwaj)

नगर जिल्ह्यात अजूनही कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असूनही, या कार्यक्रमात कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत,कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत हा कार्यक्रम हजारों लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे रोहीत पवारांना टिकेला सामोरे जावे लागतं आहे. जरी टिकेला सामोरे जावं लागतं असले तरी मात्र, या कार्यक्रमाची इतिहासात नोंद झाली असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. Rashtrawadi going to hindutwa?)

आमचा ध्वज सर्वसमावेशक आहे. जात-धर्म-पंथांच्या पलिकडे जाणारा आमचा ध्वज आहे, समतेचा आणि एकतेचा प्रतीक असणारा आमचा ध्वज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, रोहीत पवार हे हिंदुत्वाकडे आपली वाटचाल करत असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं रोहीत पवारांनी स्पष्ट केले असून, आमचा भगवा हा सर्वसमावेशक असून तो सगळ्यांचा भगवा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.(Our saffron is all-encompassing and it is everyone’s saffron,)

भगव्याचं मी कुठेही राजकारण होऊ देणार नाही. राजकारण करायचं असेल तर ते विकासावर केलं जाईल. आजपर्यंत अनेकांनी भगव्यावर राजकारण केलं. आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी याचा वापर केला गेला. मात्र आमच्याकडून कदापीही असं होणार नाही. असंही रोहीत पवारांनी स्पष्ट केले आहे. (I will not allow saffron to become politics anywhere.)

रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांनी आपल्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वजाला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधक याचे राजकारण करण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. (Opponents are likely to politicize it)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.