Dasara Melava; मी पुन्हा येईन म्हणणारे मी गेलोच नाही म्हणतायत,नाही गेला तर बसा तिकडेच;उद्धव ठाकरेंचा घणाघात

या वर्षी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं होतं. वर्षभरात झालेले राजकीय चढ-उतार आरोप-प्रत्यारोप पाहता या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. (Uddhav Thackeray on Devendra fadanvis)

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा(shiv sena Dasara Melava) कोरोनामुळे यावर्षी षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना अनेक मुद्दे उपस्थित केले. गेल्या वर्षभरात विरोधकांकडून विनाकारण कशाप्रकारे वैयक्तिक हल्ला केला गेला,हे प्रामुख्याने त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दसरा मेळाव्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांचाही सरकून समाचार घेतल्याचे पाहिला मिळाले. मात्र या सगळ्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवलेला हल्ल्याची जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. जर तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर आज कदाचित मुख्यमंत्री असता. मात्र तुम्हाला शिवसैनिक हा फक्त आपली पालखी वाहण्यासाठीच आहे. असा भ्रम डोक्यात घुसल्याने तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला नाही. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हणणारे, मी गेलोच नाही, मी गेलोच नाही,असं म्हणताय गेलाच नाही तर बसा तिथेच. असा मिश्किल टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरे फडणवीसांना असं का म्हणाले?

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यांच्या विविध प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते,”मी मुख्यमंत्री नाही, असं जनतेने मला कधी वाटू दिले नाही. जनतेच प्रेम मला अजूनही मिळतंय. शेवटी पद महत्त्वाचं नसतं,आपण काय करतोय हे खूप महत्त्वाचं असतं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या वाक्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला.( The people have never let me think that I am not the Chief Minister)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातल्या एकूण परिस्थितीवर देखील भाष्य केलं. महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी सरकार’ने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होताना पाहायला मिळतोय. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,”महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे,असं म्हणता,तर मग उत्तर प्रदेशात काय लोकशाहीचा ‘मळा’ फुलला आहे काय? असा संतप्त सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray has commented on the overall situation in the country)

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा कोरोनामुळे यावर्षी ‘षण्मुखानंद सभागृहात’ 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आता या दसरा मेळाव्यावर विरोधक काय बोलतायत,खासकरून देवेंद्र फडणवीस हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.