IPL2021:पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने ‘आयपीएल’च्या या मोसमावर’राज’केलं असलं तरी एकेकाळी धोनी त्याला म्हणाला होता,मला याच्यामध्ये स्पार्क दिसत नाही

आयपीएलच्या या हंगामात अनेक भारतीय युवा खेळाडूंनी आपला बोलबाला दाखवत चमकदार कामगिरी केली आहे.

ऋतुराज गायकवाड,देवदत्त पाड्डीकल व्यंकटेश अय्यर,आवेश खान,कार्तिक त्यागी,यशस्वी जयस्वाल,शिवम दुबे, अशा अनेक खेळाडूंनी या आयपीएलमध्ये आपली छाप सोडत अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

काल खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामधील सामन्यात पुण्याच्या ‘ऋतुराज गायकवाड’ने तुफानी फलंदाजी करत,आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत अनेकांची मनं जिंकली.

‘ऋतुराज गायकवाड’ने या आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा काढल्या आहेत. ऋतुराज ने 12 सामन्यात 50 च्या सरासरीने 508 धावा काढल्या आहेत.

ऋतुराजने आयपीएलच्या या हंगामावर आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजने अक्षरशः’राज’ केलं आहे.

 

गायकवाडने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? महेंद्रसिंग ‘धोनी’ याच ‘ऋतुराज’ला गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये म्हणाला होता,मला युवा खेळाडूंमध्ये कोणताही स्पार्क दिसत नाही.

‘दुबई’मध्ये झालेल्या गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये ‘चेन्नई सुपर किंग्स’अगदी तळला राहीली होती. चेन्नई सुपर किंगवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच साखळीत गारद होण्याची नामुष्की ओढवली होती.

चेन्नई सुपर किंग्सच्या खराब प्रदर्शनावर जेव्हा समालोचक यांनी महेंद्रसिंग धोनीला तुम्ही युवा खेळाडूंना का संधी देत नाही?असा प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता, मला कोणत्याही युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नाही.

मात्र गेल्या वर्षी झालेल्या मोसमात ऋतुराजला शेवटच्या तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली,आणि तीन्हीं सामन्यात ऋतुराजने आपला जलवा दाखवत धोनीचा अंदाज चुकीचा ठरवला होता.

 

या मोसमाची सुरुवात देखील पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने धडाक्यात करत या मोसमावर आता आपलेच ‘राज’चालणार असल्याचे,दाखवून दिले.

आयपीएलच्या या मोसमात ऋतुराजने सर्वाधिक धावा काढत ‘ऑरेंज कॅप’ आपल्या डोक्यावर परिधान केली आहे.

‘ऋतुराज’च्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे अनेक दिग्गज दीवाने झाले असून,ऋतुराज गायकवाड लवकरच भारतीय संघात आपला बोलबाला दाखवतांना पाहायला मिळेल असे अनेकांनी म्हटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.