IPL14: नाचो रे नाचो…चेन्नईच्या चाहत्यांसाठी खूशखबर,आयपीएलचा राजा स्पर्धेबाहेर?

दुबईमध्ये सुरू असलेला आयपीएलचा १४वा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून चौथ्या क्रमांकासाठी अनेक संघात चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज शारजाह क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या महत्वपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाल्याने ही स्पर्धा आणखीन रंगतदार अवस्थेत येऊन पोहचली आहे.

रोमांचक झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवत मुंबई इंडियन्सचे अंतिम चारमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अधिक धुसर केले आहे.

आयपीएलच्या इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम म्हणून मुंबई इंडियन्सकडे पहिलं जातं. सर्वाधिक वेळ आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा कारनामा देखील मुंबई इंडियन्स याच संघाने केला आहे. मात्र यावर्षी साखळीतच गारद होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.

मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यात पाच विजय तर तब्बल सात वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जरी मुंबई इंडियन्सने या स्पर्धेतील उर्वरित दोन सामने जिंकले तरी देखील त्यांना आता अंतीम चारमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

आज दिल्लीकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी आता अधिक रंगत निर्माण झाली आहे. आणि पंजाब किंग्स आणि कोलकत्ता नाइट रायडर्स या दोन संघांना देखील अंतिम चारमध्ये पोहोचण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.

मुंबई इंडियंस,पंजाब किंग्स आणि कोलकता नाईट रायडर्स या तिन्हीं संघापैकी अंतिम चारमध्ये पोहोचण्याची सर्वात जास्त संधी ही कोलकत्ता संघाला आहे.

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन या दोन्ही संघाच्या तुलनेत कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा रन रेट चांगला आहे. जर कोलकत्ताने उर्वरित दोन सामने जिंकले तर,या दोन्ही संघाला पछाडून कोलकत्ता नाइट रायडर्स जवळपास अंतीम चारमध्ये आपले स्थान निश्चित करणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.