Photo| मातीशी नाळ असणारा आमदार, तब्बल 6 किमी रस्ता दुरुस्तीसाठी लोकांसोबत केले श्रमदान.
Photo | आत्तापर्यंत आपण बऱ्याच आमदारांना मोठ्या वाहनांमध्ये ताफ्यासह फिरताना कधीकधी तर पदाचा गैरवापर करून वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळवताना पाहिले असेल. कधीकधी फोटोशूटसाठी काहीतरी करणारे आमदार देखील पाहिले असतील. परंतु एक असे आमदार आहेत ज्यांनी पूर्ण वेळ श्रमदान करून 6 किमी रस्ता लोकांबरोबर बांधून काढला आहे.
झारखंडमधील कोलेबिरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमन विक्सल कोंगडी यांनी आपल्या पदाचा गर्व बाजूला ठेऊन स्वतः गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं आणि फक्त फोटोशूट साठी नव्हे तर स्वतः देखील मातीत काम केले.
कोलेबिरा तालुक्यातील लोकांना त्यांच्या गावामध्ये जाण्यासाठीचा रस्ता खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता.
गावकऱ्यांनी हा रस्ता तयार दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार केली होती. परंतु या रस्त्याच्या डागडुीजीसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही.
दरम्यान झापला या गावामध्ये महिला आणि पुरुष यांच्यासाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला आमदार नमन विक्सल कोंगडी यांना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता तयार करण्यासाठी आमदारांकडे मदत मागितली तेव्हा आमदार नमन कोंगडी यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
स्वतः आमदार नमन कोंगडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी श्रमदान करत रस्त्यावर काम करू लागल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
श्रमदान करणाऱ्या सर्व श्रमदात्यांना आमदार नमन कोंगडी यांनी केवळ जेवणाची व्यवस्था केली नाही तर त्यांनी स्वतः मातीचे ओझे खांद्यावर घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदानाचे काम केले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम