वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करण्याची गरज … – रुपालीताई चाकणकर

0

साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.  एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून त्या महिलेला मारहाण देखील करण्यात आली होती उपचारादरम्यान पीडित 32 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून महा विकास आघाडी वर ताशेरे ओढले आहे. ठाकरे सरकारने याबाबत कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. रूपालीताई म्हणाल्या  साकीनाकामधील घटना निंदणीय, संतापजनक आहे.  नेहमी अशा घटना घडल्यानंतरच अशा चर्चा करणार आहोत का? मग कँडल मार्च, निषेध नोंंदवणार आहे का?  रूपालीताई चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर 4-5 दिवस चर्चा करतो आणि विसरुन जातो.

पुढे अशा घटना घडू नये म्हणून आपण चर्चा करतो. मात्र याबाबत ठामपणे भूमिका घेणं गरजेचे आहे. आपल्या देशात कायदे आहेत, कायद्याचं राज्य आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. परंतु मुलांना घरातील संस्कार महत्वाचे झाले आहेत. आजकाल आपण पाहतोय नाती विसरुन बाप मुलीवर, भाऊ बहिणीवर बलात्कार करतो. वयात येणाऱ्या मुलांवर योग्य संस्कार करणं गरजेचे आहे. अशा शब्दांमध्ये  रुपालीताई यांनी आपले मत व्यक्त केले.

रूपालीताई म्हणाल्या, आमच्या खासदारांनी केंद्र शासनाला कित्येकदा अनेकदा पत्र पाठवून पोर्नोग्राफी वेबसीरीज वाढलेत त्याला कुठे तरी आळा घालावा अशी मागणी केली आहे.  वयात येणारी मुल त्यांच्या आजूबाजूला  घडणाऱ्या घटना पाहून त्याचं अनुकरण करत असतात.  शालेय अभ्यासक्रमात  लैंगिक शिक्षणाचा प्रभावी वापर करुन वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करण्याची गरज असल्याचे रुपलीताई म्हणाल्या.

वाढलेली विकृत मनस्थिती आणि माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा खऱ्या अर्थाने अंत करायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवणं गरजेचे असल्याचे मत रुपालीताई यांनी मांडले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.