महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

0

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन  भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  मुंबईतील सत्र न्यायालायाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा मध्ये छगन भुजबळ दोन वर्ष तुरुंगात होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी देखील एसीबीकडे अर्ज केला होता.  आपल्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे  आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ म्हणाले होते.  त्यानंतर  न्यायालयाने भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याविरोधात  पुरावे असल्याचा दावा करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांनी केलेल्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीला विरोध दर्शविला होता. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी भुजबळ आणि कुटुंबीयांना पैसे मिळाले होते असा दावा एसीबी कडून करण्यात आला होता व याचा पुरावा असल्याचा देखील दावा लाचलुचपत विभागाकडून करण्यात आला होता. मात्र, कोर्टाकडून आरोपींविरोधात  सबळ पुरावे लाचलुचपत विभागाकडे नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामधून  कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ , मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या  समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी, पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांनादेखील निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.