Chipi Airport: बाप बाप होता है…’; चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून नितेश राणेंनी केली टीका

0

 Chipi Airport ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 7 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे  परिषद घेऊन पत्रकार परिषद घेऊन कोकणातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा केली. नारायण राणे यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर  टीकास्त्र सोडले. राणे म्हणाले, “उद्घाटनाच्या कार्यक्रमाला  मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही,  नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेतच.  त्यामुळे चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद होण्याची चिन्हे आहेत.( Minister Narayan Rane anounce the inauguration of the much awaited Chippewa Airport in Konkan.)

पुढे बोलत असताना राणे म्हणाले, 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळावरून वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. मी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. मुंबईतून आम्ही  सिंधुदुर्गाला जाणार आहोत. चीपी विमानतळ गेली ७ वर्ष हे विमानतळ बांधून तयार आहे. मात्र विमानतळ वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना आज सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाची वेळ घेतली, असे राणे म्हणाले.

चीपी विमानतळाच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांचे पुत्र  आमदार नितेश राणे यांनी  ट्विटरवरून शिवसेना व  खासदार विनायज राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी  ‘अखेर प्रतीक्षा संपली. चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार. आता विदूषक खासदार विनायक राऊत यांनी नाचणं बंद करून एक मान्य केलं पाहिजे की बाप बाप होता है ! धन्यवाद मोदीजी !’ अशा शब्दात ट्विट केले आहे.

नुकतेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी  येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होईल. विमानतळाला डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास अवघ्या 2500 रुपयांमध्ये होऊ शकेल. आम्ही नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना लायसन्स मिळाल्याचे सांगितले.  अशी माहित 5 सप्टेंबर रोजी खासदार विनायक राऊत यांनी दिली होती.

मात्र नारायण राणे यांनी 7 सप्टेंबर ऐवजी 9 सप्टेंबर ही तारीख जाहीर करून शिवसेनेला डिवचले आहे असे बोलले जात आहे. कारण अगोदर तारीख देऊन देखील राणे यांनी मुद्दाम दोन दिवस तारीख पुढे ढकलली आहे. या प्रकरणावरून राणे यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली असल्याचे बोलले जात आहे.

  अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ सप्टेंबरला दिली होती. आता, त्यात २ दिवस वाढवून ९ ऑक्टोबर रोजी राणेंच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटनामुळे शिवसेनेवर त्यांनी कुरघोडी केल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.