घंटानाद प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0

 शहरामध्ये असणारी धार्मिक स्थळे भक्तांसाठी चालू करण्यासाठी मनसे कडून गुलमंडी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.घंटानाद आंदोलन करण्यासाठी मनसेने  पोलिसांकडून परवानगी देखील घेतली होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मनसेला  परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, या घंटानाद  आंदोलनाबाबत  सिटी चौक पोलीस ठाणे येथे मनसे कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्य सरकार कडून सध्या कोरोना निर्बंध  शिथिल करण्यात आले आहे. सर्व निर्बंध शिथिल होत असताना मात्र, धार्मिकस्थळ, मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाली नाही. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांकडून गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात  कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.

या प्रकरणाबाबत सिटी चौक पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा समवेत विविध कलमा अंतर्गत सुहास दाशरथे, सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, रशीद अब्दुल, आशिष सुरडकर, राजीव जावळीकर, संदीप कुलकर्णी यांच्यासह इतर 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘सैराट’फेम तानाजी गलगुंडे रस्त्यावर कोथिंबीर विकताना झाला कैद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.