Muktainagar News:शासनाच्या नियमानुसार’गणेशोत्सव’साजरा करण्यास परवानगी

0

अनिल वाडीले,मुक्ताईनगर: जळगाव मधील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करताना पाहायला मिळते. कोणताही सामाजिक उपक्रम असल्यास स्थानिकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक’राहुल खताळ’यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवारी गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीत गावातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतला होता.

काल पार पडलेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कोरोणा संबंधी सर्व नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीच्या बैठकीत माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ विचारवंत एस.ए. ‘भोईसर’यांनी मार्गदर्शन केले. ‘गणेशोत्सव’हा एक सामाजिक प्रबोधनाचा ‘उत्सव’ आहे. आणि म्हणून धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्याचे काम आपण प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे बोईसर यांनी यावेळी बोलताना आपले विचार मांडले.

गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचा सत्कार शेख करीम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अंतुर्ली गावच्या सरपंच सुलभाताई शिरतुरे,उपसरपंच गणेश तराळ,माजी सरपंच विलास पांडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.