Corona Cases In Maharashtra | राज्यात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…

0

 Corona Cases in Maharashtra|महाराष्ट्रामध्ये  काल 5,609 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, हे सर्व कोरोनामूक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 एवढ्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8 टक्के एवढे झाले आहे. ( Corona Cases In Maharashtra:  In Maharashtra, 5,609 corona patients were registered yesterday. While 7,720 patients have been discharged, all of them have been corona test Negative)

आतापर्यंत तब्बल 4, 99,05, 096 लोकांची कोरोणा चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी  63,63, 442 (12.75 टक्के) टेस्ट ह्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  सध्या महाराष्ट्रात 4,13,437 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये असून 2, 860 व्यक्ती वेगवेगळ्या संस्थांच्या  क्वारंटाईनमध्ये आहेत. संपूर्ण देशभरातीमध्ये गेल्या 24 तासात  28,208 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. देशभरात काल 373 लोकांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.

काल 41,511 लोक कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. काल एकाच दिवसामध्ये 13,680 अॅक्टिव रुग्णसंख्या कमी झाली.  राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे प्रमाण हे ३० हजारांहून अधिक झाल्यास तत्काळ कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. वारंवार तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करताना उपलब्ध ऑक्सिजनचा  विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास राज्यात पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन जाहीर करावी अशी भूमिका कुंटे यांनी राज्य सरकारसमोर मांडली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.