Covaxin and Covishield : कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोस एकत्रित घेतल्याने काय होतंय?

Covaxin and Covishield:   कोवॅक्सिन ( Covaxin )  आणि कोविशिल्ड ( Covishield ) या दोन्ही लसींचा एकत्रित डोस घेतल्यामुळे अधिकच फायदा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही लसींचा मिक्स डोस घेतल्याने त्याचा कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे. ICMR ने दिलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे.  पहिला डोस एका प्रकारचा व दुसरा डोस वेगळ्या प्रकारचा डोस घेऊ नका, याचे साईड इफेक्ट शरीरावर होत असल्याचे   सरकार कडून सांगण्यात येत होते. परंतु  ICMR च्या अवहालावतून ,  दोन लसींचे ‘मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग’ डोस घेतल्याने फायदेशीर ठरत असल्याचे  सांगण्यात येत आहे. (Corona Vaccine: Covaxin  and covshield vaccines combined are more beneficial.)

महत्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणं हे अधिक सुरक्षित असल्याचंही आयसीएमआरने आपल्या या अभ्यासात सांगितलं आहे. या आधी देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लसीचा तूटवडा निर्माण झाला असताना उपलब्ध असलेल्या दुसऱ्या कंपनीची लस घेता येईल का अशी चाचपणी सुरु होती. पण त्यावेळी दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेऊ नका, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं.

ICMR च्या नव्या अहवालानुसार दोन वेगवेगळ्या लसी एकत्रित घेता येतील येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.  कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield)  या दोन वेगवेगळ्या लसींचे प्रत्येकी एक डोस घेतल्यास कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी फायदा होईल.

त्या आधी एका अभ्यासातून आयसीएमआरने सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो. येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी ही बाब नक्कीच फायदेशीर ठरेल. नुकताच जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसला  हिरवा कंदील मिळाला आहे. ही लस आपत्कालीन काळामध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.