Corona Vaccination: कोवीशिल्ड लस घेतलेल्यांसाठी चिंतेची बाब.

Corona Vaccination: गेले कित्येक महिन्यांपासून कोरोणाने थैमान  घातले होते. सध्या कुठे रुग्णांची संख्या मंदावली आहे. दुसरी लाट ओसरली असली तरीदेखील तिसऱ्या लाटेची  भीती व्यक्त केली जात आहे. सध्या प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्यावरचा ताण कमी झाला आहे. कॉरोना लसीकरणाची गरज असताना सध्या लशींचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. देशात कोविशिल्ड व कोवॅक्सिन  या दोन्ही लसींचा वापर सर्वात जास्त होत आहे.

सिरमची उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे देशात कोविशिल्ड लस उपलब्ध होत होती. बऱ्याच लोकांनी कोविशिल्ड लस घेतली आहे.  एका नव्या अभ्यासानुसार कोविशिल्ड व फायझर या दोन्ही लशी घेतलेल्या लोकांची दोखेदुखी वाढली आहे. एका नव्या अवहलानुसार वरील दोन्ही लशी घेतलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबोडीज ७ आठवड्यानंतर कमी होत आहेत. ( Corona Vaccination: pfizer  astrazeneca vaccine antibody levels may decline 2-3 months)

शरीरातील अँटीबोडीज कमी होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण १० आठवड्यानंतर तब्बल ५० टक्के अँटीबोडीज कमी होत आहेत आणि हे जर असेच चालू राहिले तर कोरोना विषाणुशी लढा देणे कठीण होईल.  फायझर लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडीजचे प्रमाण
कोविशिल्ड लाशीचे दोन डोस घेतल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडीजपेक्षा जास्त आहेत.

कोविशिल्ड व फायझर या दोन्ही लशी घेतलेल्या नंतर दोन ते तीन महिन्यांत  अँटीबॉडीजचे प्रमाण अचानक कमी होत आहे. १८ वर्षांवरील सुमारे ६००  लोकांवर करण्यात संशोधनानुसार ही बाब उघड झाली आहे.  त्यामध्ये स्त्री व पुरुष यांचा समावेश होता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.