Corona Vaccine: कोरोनाच्या नव्या विषाणूंवर मात करण्यासाठी बूस्टर डोसची गरज : डॉ रणदीप गुलेरिया

Corona Vaccine: देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवन्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या पटेपेक्षा तिसरी लाट ही भयंकर असू शकते अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. प्रशासन याबाबत सतर्क असून विविध उपाययोजनांची तयारी सुरू आहे .

एम्सचे (AIIMS) डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, “कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट सध्या येत आहेत. कोरोनाच्या व्हेरिएंट या नव्या व्हायरसशी लढा देण्यासाठी बूस्टर डोसची गरज पडेल. पुढे बोलताना ते म्हणाले, “भविष्यामध्ये कोरोना व्ह्यायरसचे आणखी नवीन व्हेरिएंट येऊ शकतात आणि नवनवीन व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी देशाला कोविड लसीकरणासोबतच (Covid vaccine) बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे.” (AIIMS director Dr Randip Kuleriya comment on Corona Vaccine booster dose and new variants)

AIIMS संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले, “जसजसा कालावधी जाईल तसतशी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर बूस्टर डोस नागरिकांना देण्याची गरज आहे. बूस्टर डोसमुळे पुढे येणाऱ्या नव्या कोरोना व्ह्यायरसपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपयोगी होईल . अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.