Immunity Booster Fruits: आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी फळे

 

Health Tips : पावसाळ्यामध्ये दूषित पाणी, वातावरण यामुळे रोगराई होण्याचे प्रमाण वाढत असते. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या आहारामध्ये बदल करणे गरजेचे असते. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठीसुद्धा आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

योग्य आहार व व्हिटॅमिन सी (Vitamin C) युक्त आहार घेणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे आणि शरीर निरोगी ठेवणे या दोन्ही गोष्टी व्हिटॅमिन सी मुळे होत असतात . व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात मिळवण्यासाठी कोणती फळे उपयुक्त आहेत, हे आपण जाणून घेऊ.

1) आंबा (Mango) : आपल्या सर्वांना आवडणारे व उन्हाळ्याच्या ऋतु मध्ये उपलब्ध होणारे फळ आंबा हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आंबा फलामधून आपल्या शरीराला सुमारे 122 मिलीग्राम (122 mg) व्हिटॅमिन सी मिळत असते.. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील असते. व्हिटॅमिन ए चा फायदा आपल्या डोळ्यांना होत असतो.

 

2) पेरु : पेरु हे फळ आपल्याला सहजपणे कुठेही उपलब्ध होत असते. पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.  पेरु व्हिटॅमिन सी युक्त असे पौष्टिक फळ आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल पेरूमध्ये संत्रीपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. पेरू आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. एका मध्यम पेरूमध्ये सुमारे 200 ग्रॅम पौष्टिक पदार्थ असतात.

3) पपई : पपई हे पचनक्रियेसाठी उत्तम फळ मानले जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण आढळते. पपई खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. पपई खाल्याने आपल्या शरीराला पौष्टिक घटक मिळतात.

4) स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म आणि इतर अनेक पोषक घटक असतात. या हंगामामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी मिळतात. साधारण एक कप स्ट्रॉबेरी ज्यूस पिल्यानंतर आपल्या शरीराला 100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.

5) किवी : किविमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. किवी फळामध्ये साधारणपणे 85 मिलीग्राम एवढे व्हिटॅमिन सी आढळते. किवी फळामध्ये के (K) आणि ई( E ) ही दोन्ही जीवनसत्त्वे असतात. तसेच किवी फळामध्ये इतर देखील अनेक पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.