वजन कमी करायचे आहे, मग हा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर

 

  1. आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, शरीराचे अनावश्यक वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या बाबतीत संतुलन असणे खूप महत्वाचे आहे. कारण आपण काय खातो, कधी खातो, किती खातो याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. नेहमी व्यायाम, रनिंग करणं देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. सोबतच दररोज पाणी पिण्याची सवय देखील आपण आपल्या शरीराला लावली पाहिजे. प पाणी पिण्याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

लिंबू पाणी पिणे हे देखील आपल्या शरीराला फायद्याचे ठरते. लिंबू पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे हे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत.
लिंबामध्ये असणारा सी जीवनसत्व हा घटक पचनशक्तीचा एक उत्तम स्त्रोत आहे.

लिंबामध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. लींबामध्ये थियामिन, रिबोफ्लोविन, नियासिन, व्हिटामिन बी-६, फोलेट आणि व्हिटामिन- ई असतं देखील असते. लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढतं. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि त्यामुळेच बरेच तज्ज्ञ लोक आपल्याला दररोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देत असतात.

कशाप्रकारे लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता?

1. लिंबू पाण्यामध्ये तुम्ही गूळ मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर या पाण्यामध्ये गूळ मिक्स करून दहा मिनिटे उकळू द्या. त्यानंतर शेवटी या गुळपाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्या. अशा पद्धतीने लिंबू पाणी घेतल्यास आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पाणी तुम्ही सतत आठ दिवस घेतले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

२. 3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी (Green Tea), 1 चमचा मध, 2 चमचे आल्याची पावडर, 3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस घ्या. हे सर्व साहित्य फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व एकत्रित करून घ्या. त्यानंतर हे सर्व साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

3. सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून प्या. यानेदेखील तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

( वरील उपाय करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.