विज पुरवठा खंडित होऊन चार दिवस झाले,मात्र अद्यापही कामास सुरुवात नाही;पिंपरीकरांनी व्यक्त केला संताप
दोन तारखेला बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झालेला पाऊस आणि वादळामुळे माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावातील अनेक भागात खूप मोठ्या प्रमाणात ‘वित्तहानी’ झाल्याचे आढळून आले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची ‘जीवितहानी’ झाली नसली तरी, लोकांना खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानीला सामोरं जावं लागलं आहे.
बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झालेला पाऊस आणि वादळाने पिंपरीतील काही भागात विजेचे पोल पडल्याने विज पुरवठा ‘खंडित’ झाला आहे. पिंपरीतील राणबादेववस्ती येथे सिंगल फेज लाईनचे तीन पोल पडले असल्याने,साईनगरचा काही भाग आणि राणबादेववस्ती वरील विजपुरवठ्या खंडित झाला आहे.
आज हा विजपुरवठा खंडित होऊन चौथा दिवस उजाडला तरीसुद्धा अद्यापही विज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. खंडित झालेला विज पुरवठा सुरळीत होणं खूप लांबची गोष्ट आहे. अद्याप,खंडित झालेल्या विजपुरवठ्याचे कामही सुरू करण्यात आलेले नाही. हे खूप दुर्दैवी असल्याचे सांगत, राणबादेववस्ती वरील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चार दिवस उजाडून देखील खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचे अद्याप काम देखील सुरू करण्यात आले नसल्याने, आम्हाला आणखी बरेच दिवस अंधारातच राहावं लागणार असल्याची खंत नागरीकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून वीज नसल्याने आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. लाईट नसल्याने दळण दळण्यासाठी आम्हाला तीन किलोमीटर जावं लागतंय. कोरोणाच्या या परिस्थितीत हे जिवाशी एकप्रकारे खेळण्यासारखाच प्रकार असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं.
ग्रामपंचायत प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. मूलभूत सुविधांपासूनच वंचित राहावं लागत असल्याने,आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्रामपंचायत प्रशासनाने या संबंधित ठोस पावले टाकून आम्हाला न्याय द्यावा,अशी भावना स्थानिकांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली आहे.
राणबादेववस्ती या ठिकाणी सिंगल फेज लाईनचे पडलेले तीन पोल आता कधी दुरुस्ती होतायत? आणि या भागाचा विज पुरवठा कधी सुरळीत चालू होतोय? हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम