पावसाळ्यात नेहमी आपलं आरोग्य का ढासळतं? पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?

 

पावसाळा सुरू झाला म्हटलं की, अनेक आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यात सगळ्यात मोठं आव्हान असतं ते आपल्या आरोग्याचं!

कडक उन्हाळ्यानंतर अनेकांना पावसाळा हा ऋतू आवडतोच! अनेकजण हे पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पाण्यावर अनेक उद्योगधंदे अवलंबून असल्याने पावसाची आवश्यकता ही असतेच. मात्र हे सगळं खरं असलं तरी पावसाळ्यात आपलं आरोग्य ढासळण्याची दाट शक्यता असते. हे आपल्याला माहीत आहे का?

पावसाळ्यात आपल्या समोर आरोग्याची खूप मोठी समस्या निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असतं. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्याच बरोबर प्रत्येकाची पचनक्रिया व्यवस्थित राहतेच असं नाही. त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला आपल्या आहाराचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

पावसामुळे पाणी हे दुषित होते. पावसाच्या पाण्यामुळे आपल्या नियमित वापराचे,पिण्याचे पाणी दुषित होत असते. आणि त्यामुळे विविध आजार पसरतात. आणि आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात नेहमी आपली पचनक्रिया मदावते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. आणि म्हणून आपल्याला आपल्या आरोग्याचे आणि आहाराचे नियोजन करणं अत्यंत गरजेचे आहे.

१) पावसाळ्यात पचनक्रिया मंदावल्यामुळे आहार हा नेहमी प्रमाणापेक्षा कमीच असणं खूप महत्त्वाचं असतं. अन्न प्रमाणापेक्षा कमीच घेतल्याने अन्न व्यवस्थित पचन होण्यास मदत होते.

२) पावसाळ्यात आपण कोणता आहार घेतो? याला खूप महत्त्व आहे. पावसाळ्यात चुकूनही आपण बाहेरचे पदार्थ खाऊ नये! बाहेरचे पदार्थ हे स्वच्छ आणि ताजे आहेत का? हे आपल्याला अनेकदा माहीत नसतं. कदाचित ते अन्न शिळं देखील असू शकतं. खराब तेलात आणि खराब पाण्यात बनवलेले पदार्थ पावसाळ्यात आपल्या आरोग्यास खूप हानिकारक ठरू शकतात. आणि म्हणून आपण बाहेरचं अन्न खाणं टाळावं. पावसाळ्यात भेळपुरी,पाणीपुरी,रगडा पुरी,अशा पदार्थांचं सेवन आपण चुकूनही करू नये!

३) पावसाळ्यात नेहमी हलका आहार करणं गरजेचं असतं. पावसाळ्यात व्हेजिटेरियन पदार्थांवर भर देणं अधिक फायद्याचं ठरतं. पावसाळ्यात होता होईल एवढं नॉनव्हेज खाणं टाळावं! पावसाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्यामुळे,नॉनव्हेज प्रत्येकाला पचेलच असं नाही,त्यामुळे शक्यतो नॉनव्हेजचा आहार टाळावा!

४) पावसाळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी! पाणी हे नेहमी उकळलेलेच असावे! पावसाळ्यात पाणी नेहमी दूषित असल्यामुळे पाणी हे उकळलेलेच प्यावे! पाणी उकळलेले पिल्याने जुलाबाचे आजार दूर होण्यास मदत होते!

५) पावसाळ्यामध्ये आहारात नेहमी लवंग,मिरी,जिरं,दालचिनी,हळद इत्यादींचा समावेश असायला हवा. यामुळे तुमची पचनशक्ती वाढते. आणि हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात!

६) पचनक्रियासाठी जे पदार्थ फायदेशीर आहेत,त्याच पदार्थांचे सेवन पावसाळ्यामध्ये करणे गरजेचे आहे. जसं की, फळभाज्यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. फळभाज्यांचे सेवन केल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया देखील सुधारते. आणि म्हणून पावसाळ्यात फळभाज्या खूप फायदेशीर ठरतात!¨

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.