पुणे महाविद्यापीठाच्या प्रॅक्टिकल परीक्षा ऑनलाइनच

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित बस असणाऱ्या महाविद्यालयांमधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी (विज्ञान आणि तंत्रज्ञान) अंतर्गत अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंतिम मान्यता घेण्यात येईल, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एम. जी. चासकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रॅक्टिकल परीक्षा देणे शक्य नाही व महाविद्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाला देखील काही अडचणी आहेत त्यामुळे विज्ञान विषयाच्या सर्व अध्यक्षांची बैठक झाली व या बैठकीत चालू शैक्षणिक वर्षातील दोन्ही सत्राचे प्रत्येकी १० असे एकूण २० व्हिडिओ तयार करण्यात येणार आहेत.

पुढील २ ते आडीच महिन्यांमध्ये प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) घेऊन आणि त्याचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. चासकर यांनी दिली.

पुढील ८ ते १० दिवसांमध्ये हे व्हिडिओ तयार करण्यात येणार आहेत व पुढील १५ दिवसांमध्ये हे व्हिडिओज महाविद्यालयापर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. लॉक डाऊन कालावधी वाढवण्यात आल्यामुळे पुढील दीड महिना तरी महाविद्यालये चालू होण्याची शक्यता नाही. हे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट २०२१ पर्यंत संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे २ ते अडीच महिन्यात या परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

अशी माहिती माहिती विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एम. जी. चासकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.